गोंदियात महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने; प्रफुल पटेल यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 02:20 PM2020-12-08T14:20:38+5:302020-12-08T14:21:11+5:30

Gondia News Bharat Band विविध शेतकरी संगठना नी आज 8 डिसेंबर 2020 ला भारत बंद पुकारलेला असुन त्यास राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी , राष्ट्रीय काॅग्रेस,शिवसेना व इतर मित्र पक्षाचा समर्थन देण्यात आला आहे.

Protests on behalf of Mahavikas Aghadi in Gondia; Presence of Praful Patel |  गोंदियात महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने; प्रफुल पटेल यांची उपस्थिती

 गोंदियात महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने; प्रफुल पटेल यांची उपस्थिती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया : केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी अन्यायकारी धोरणामुळे आज देशात मोठया संख्येत शेतकरी आंदोलन करित आहे. विविध शेतकरी संगठना नी आज 8 डिसेंबर 2020 ला भारत बंद पुकारलेला असुन त्यास राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी , राष्ट्रीय काॅग्रेस,शिवसेना व इतर मित्र पक्षाचा समर्थन देण्यात आला आहे. गोंदिया येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस, राष्ट्रीय काॅंग्रेस, शिवसेना व इतर मित्र पक्षाच्या गोंदिया येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमे जवळ प्रदर्शन करण्यात आले व शेतकऱ्याच्या समर्थनात व केन्द्र शाशनच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. प्रदर्शन स्थळात खासदार प्रफुल पटेल आज उपस्थित होते.

या वेळी महाविकास आघाडीचे  नेते व पदाधिकारी माजी आमदार राजेंद्र जैन, जिला काॅंग्रेस कमेटी अध्यक्ष नामदेव किरसान, विनोद जैन,  अमर वऱ्हाडे,  जितेश राणे, देवेंद्रनाथ चौबे, शिवसेना चे  पंकज यादव, सर्वश्री सतीश देशमुख, नानू मुदलियार, छोटु पटले, केतन तुरकर, सुनील पटले, मयुर दरबार, खालीद पठान, रमेश गौतम, राजेश कापसे, विनायक खैरे, संजीव राय, सौरभ रोकडे, चंद्रकुमार चुटे, एकनाथ वहिले, अक्की अग्रहरी, आरजु मेश्राम, शैलेश वासनिक, विनायक शर्मा, कृष्णा भांडारकर, कपिल बावनथडे, भुवन रिनाईत, श्रीधर चन्ने, वामन गेडाम सोबत महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते.

Web Title: Protests on behalf of Mahavikas Aghadi in Gondia; Presence of Praful Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.