शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे सवलतीच्या दरात द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:30 AM2021-05-21T04:30:13+5:302021-05-21T04:30:13+5:30
केशोरी : खरिपाचा हंगाम सुरु होण्यासाठी काही दिवसच शिल्लक उरली असून खरिपाच्या पूर्व मशागतीच्या तयारीला शेतकरी लागला आहेत. खरीप ...
केशोरी : खरिपाचा हंगाम सुरु होण्यासाठी काही दिवसच शिल्लक उरली असून खरिपाच्या पूर्व मशागतीच्या तयारीला शेतकरी लागला आहेत. खरीप हंगामात शेतीसाठी योग्य बी-बियाणांची जुळवाजुळव शेतकऱ्यांना करावी लागते. अशात कोणत्याही बोगस कंपनीची बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांना जावे लागू नये किंवा बोगस बियाणापासून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
यावर्षीचा खरीप हंगाम अगदी काही दिवसाच्या अंतरावर येऊन ठेपला आहे. शेतकरी वर्ग शेतीच्या पूर्व मशागतीच्या कामात गुंतल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगामात वापरण्यात येणारी बी-बियाणे योग्य उगवण क्षमतेचे असणे आवश्यक आहे. खासगी कंपन्या अनधिकृत बियाणे विकण्यासाठी बोगस व आकर्षक जाहिरातीचे चित्र प्रकाशित करुन शेतकऱ्यांना भुरळ पाडत असतात. यामध्ये शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असते. कृषी विभाग दरवर्षी सूचना देऊन चांगली उगवण क्षमता असणारी बी-बियाणांची निवड करुन भरपूर उत्पन्न घेण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा असे सांगत असते. परंतु खासगी कंपन्याच्या बोगस व आकर्षक जाहिरातींना बळी पडून स्वत:चे नुकसान करुन घेत असतात. आता सध्या शेतकऱ्यांना चांगली बियाणे खरेदीची चिंता वाटू लागली आहे. अशातच कोरोना विषाणू महामारीचे संकट उभे ठाकले आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे उपलब्ध झाले नाही. महागड्या बियाणांची उगवण क्षमता लक्षात न घेता शेतकरी वर्ग बी-बियाणे घेत असतात. यामध्ये निश्चितच शेतकऱ्यांची फसवणूक होत असते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे सवलतीच्या दरात द्या अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे.