उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 09:05 PM2019-06-16T21:05:06+5:302019-06-16T21:08:51+5:30
योग्य उपचाराच्या आशेने गरीब रूग्ण येथे येतात. अशात त्यांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवा असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव व वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : योग्य उपचाराच्या आशेने गरीब रूग्ण येथे येतात. अशात त्यांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवा असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव व वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.
डॉ.मुखर्जी यांनी शनिवारी (दि.१५) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि केटीएस जिल्हा सामान्य रु ग्णालयाला भेट देवून पाहणी केली असता वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, वैद्यकीय शिक्षण संचालक पी.टी.वाकोडे, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.विनायक रु खमोडे उपस्थित होते.
याप्रसंगी त्यांनी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नव्यानेच बांधण्यात आलेल्या विद्यार्थी वर्ग व वाचन कक्षाची पाहणी करु न काही उपयुक्त सूचना केल्या.
अतिदक्षता, टेलिमेडिसीन, दंतचिकित्सा, डायलेसीस, बाह्यरु ग्ण व आंतररु ग्ण विभागातील वॉर्ड क्रमांक १ व २ ला भेट देवून रु ग्णांशी संवाद साधला. याप्रसंगी डॉ. रूखमोडे यांनी, प्रत्येक बुधवारी प्रत्यक्ष मुलाखतीतून सहायक प्राध्यापक व निवासी डॉक्टरांची पदे भरण्यात येतात. परंतु या मुलाखतीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याची बाब सांगितली. तसेच बधिरीकरणशास्त्र विभागात चार डॉक्टरांची पदे भरण्याची विनंती त्यांनी केली.
याबाबत लवकरच निर्णय घेवून पदभरती करण्यात येईल व स्थानिक पातळीवर सुद्धा भरती प्रक्रि या राबवावी अशी सूचना डॉ.मुखर्जी यांनी केली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभाग प्रमुख, सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
सिटी स्कॅ न मशीन नवीन इमारतीत
या भेटीत डॉ.मुखर्जी यांनी केटीएस जिल्हा सामान्य रु ग्णालयात असलेल्या सिटी स्कॅन मशीन विभागाला भेट देवून पाहणी केली. त्यांनी नवीन येणारे सिटी स्कॅन मशीन नवीन इमारतीत लावण्याच्या सूचना यावेळी केल्या. तसेच बाई गंगाबाई शासकीय स्त्री रु ग्णालयाला भेट देवून परिसराची पाहणी करु न पावसाळ््याच्या दिवसात पाण्याचा निचरा योग्यप्रकारे करण्यात यावा यासाठी दोन अतिरिक्त मोटरपंप लावण्याचे निर्देश दिले. त्यामुळे वॉर्डांमध्ये पावसाळ््यात पाणी जाणार नाही व रु ग्णांचे हाल होणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.