पोलीस कोठडीतील मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:22 AM2021-05-28T04:22:16+5:302021-05-28T04:22:16+5:30

आमगाव : शहरातील कुंभारटोली येथील राजकुमार अभयकुमार (३०) या तरुणाचा पोलीस कोठडीत शनिवारी (दि.२२) मृत्यू झाला. या घटनेतील दोषींवर ...

Provide financial assistance to the family of the deceased in police custody | पोलीस कोठडीतील मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत करा

पोलीस कोठडीतील मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत करा

Next

आमगाव : शहरातील कुंभारटोली येथील राजकुमार अभयकुमार (३०) या तरुणाचा पोलीस कोठडीत शनिवारी (दि.२२) मृत्यू झाला. या घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात यावी व मृताच्या कुटुंबाला शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात राजकुमारच्या कुटुंबात त्याचे वयोवृद्ध वडील व बहीण असून त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्यावर संकट ओढावले आहे. कुटुंबातील कर्ती व्यक्ती मरण पावल्याने कुटुंबाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. याकरिता शासनाने त्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, तालुकाध्यक्ष कमलबापू बहेकार, उपाध्यक्ष रवी क्षीरसागर, संघटक संजय रावत, संतोष श्रीखंडे, आनंद शर्मा, धनलाल मेंढे, स्वप्नील कावळे, सुमित कन्नमवार, रमण डेकाटे आदी उपस्थित होते.

Web Title: Provide financial assistance to the family of the deceased in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.