वारकरी साहित्य कलावंतांना आर्थिक मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:34 AM2021-09-04T04:34:12+5:302021-09-04T04:34:12+5:30
गोरेगाव : वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य गोंदिया वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने साहित्य कलावंतांना आर्थिक मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री ...
गोरेगाव : वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य गोंदिया वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने साहित्य कलावंतांना आर्थिक मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे तहसीलदार सचिन गोस्वामी यांना दिलेल्या निवेदनातून वारकरी साहित्य परिषदेने केली आहे. यावेळी दिलेल्या निवेदनातून देशात कोरोना महामारीच्या काळात शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने समाजातील सर्वच घटकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. याचा फटका वारकरी साहित्य कलावंतांना बसला. वारकरी संप्रदायातील लोक समाजात धार्मिक उपक्रम अखंड हरिनाम, सप्ताह, पारायण, सोहळे प्रदीर्घ काळापासून बंद असल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे कीर्तनकार, प्रवणकार, गायक, वादक, टाळकरी, या सर्व कलावंतांना या संकटाच्या काळात आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. साहित्य परिषदेचे हभप काशीनाथ भेंडारकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डाॅ. लक्ष्मण भगत, माजी सभापती विश्वजीत डोंगरे, हभप राधेशाम पटले गोवारीटोला, केशवराव टेकाम, छगनलाल बोपचे, पंढरी कटरे, ताणनबाई रहांगडाले, टिकाराम आसोले, नारायण भिमटे, भोजराज डुंभरे, बाबुलाल रहांगडाले, बशीराम कावळे, पुस्तकला रहांगडाले, स्वामी यशेसरानंद सरस्वती, प्रितीलाल पटले ,घनश्याम टेभुर्नीकर, नेतराम बिसेन, मनोहर कटरे यांचा समावेश होता.