ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा त्वरित पुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:27 AM2021-04-18T04:27:49+5:302021-04-18T04:27:49+5:30
तिरोडा : जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. अशात ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुडवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या ...
तिरोडा : जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. अशात ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुडवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची लूट केली जात आहे. मात्र, यानंतरही प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना केली नाही. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. जिल्ह्याला ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा त्वरित पुरवठा न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याचा इशारा जनक्रांती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बन्सोड यांनी दिला आहे.
जिल्ह्यात ऑक्सिजन सिलिंडर, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा या बाबी वारंवार पुढे येत आहेत. अनेक नेते मंडळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहे; पण यानंतरही काहीच उपाययोजना करण्यात करण्यात आल्या नाहीत. कोरोना ही नैसर्गिक आपत्ती आहे. राष्ट्रीय स्तरावर जेव्हा आपत्ती निर्माण होते तेव्हा केंद्र सरकारची नैतिक जबाबदारी असते की औषधी असो वा ऑक्सिजन किंवा इतर व्यवस्था असो यांची तात्काळ व्यवस्था केंद्र सरकारने करावी; परंतु केंद्र सरकार यावर गंभीर दिसत नसल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकार फक्त पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून आहे. जागतिक आरोग्य संघटनेने वारंवार सूचना करून, तसेच इंग्लंडमध्ये स्ट्रेंट कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याचे वारंवार केंद्र सरकारला माहिती असून देशातील प्रत्येक घटक राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या फेरीची लागण होणार हे लक्षात घेऊन लसीकरण झपाट्याने करणे, काही विदेशी लस त्वरित बोलाविण्यात याव्यात. ऑक्सिजन लोकसंख्येच्या आधारावर औषधीचे निर्माण करून ठेवणे. रेमडेसिविर इंजेक्शनच्या उत्पादनात वाढ करणे. या बाबी केंद्र सरकारने गांभीर्याने का घेतलेल्या नाहीत. ही बाब जनतेला न समजण्यासारखी आहे. केंद्र सरकारला निवडणूक महत्त्वपूर्ण वाटली; परंतु लोकांचा जीव महत्त्वाचा नाही असे वाटते. जिल्ह्यात प्रत्येक कोविड सेंटरमध्ये असणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत जर ऑक्सिजन सिंलिडर पुरवठा नसेल, तसेच आवश्यक असणारे रेमडेसिविर इंजेक्शन नसेल तर याचा पुरवठा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तात्काळ झाला नाही, तर तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशारा दिला आहे.