एकस्तर वेतनश्रेणी लाभ व नक्षलभत्ता द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 05:00 AM2020-08-15T05:00:00+5:302020-08-15T05:00:02+5:30
निवेदनात, १० ते १२ वर्षात पदोन्नती होणे अभिप्रेत आहे. परंतु त्याऐवजी कालबद्ध स्वरूपात आर्थिक पदोन्नती दिली जात आहे. कालबद्ध पदोन्नती घेतल्यावरही एकस्तर वेतन निश्चिती करणे व नक्षलग्रस्त भागातून निघाले नसल्यामुळे देय करणे तर्कसंगत असल्याचे म्हटले आहे. एकस्तर श्रेणी ही नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत लागू असते. मात्र १२ वर्षानंतर तो कर्मचारी त्या भागातून बाहेर पडताच त्याची वेतनश्रेणी कमी करण्यात येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ तसेच नक्षलग्रस्त भत्त देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी युनियनच्यावतीने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात, १० ते १२ वर्षात पदोन्नती होणे अभिप्रेत आहे. परंतु त्याऐवजी कालबद्ध स्वरूपात आर्थिक पदोन्नती दिली जात आहे. कालबद्ध पदोन्नती घेतल्यावरही एकस्तर वेतन निश्चिती करणे व नक्षलग्रस्त भागातून निघाले नसल्यामुळे देय करणे तर्कसंगत असल्याचे म्हटले आहे. एकस्तर श्रेणी ही नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत लागू असते. मात्र १२ वर्षानंतर तो कर्मचारी त्या भागातून बाहेर पडताच त्याची वेतनश्रेणी कमी करण्यात येते. हे तर्कसंगत नसून एकस्तर वेतनश्रेणीला संरक्षण देवून कालबद्ध पदोन्नतीची मागणी करण्यात आली आहे.
याकरिता शासन स्तरावर सुधारित शुद्धीपत्रक काढून न्याय देण्यात यावा. तसेच १ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्ती आदेश देण्यात आलेल्या सर्वांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देताना ग्रामसेवक संघटनेचे विभागीय अध्यक्ष कमलेश बिसेन, मानद अध्यक्ष कार्तिक चव्हाण, सचिव दयानंद फटींग, लक्ष्मण ठाकरे, सचिन कुथे, धर्मेंद्र पारधी, अरूण हातझाडे, नीशीकांत मेश्राम, गणेश मुनेश्वर व बहेकार उपस्थित होते.
वरिष्ठ सहायक पदलमवार यांना हटवा
पंचायत विभागात कार्यरत वरिष्ठ सहायक पदलमवार यांची प्रशासकीय बदली होवूनही गेल्या २ वर्षांपासून ते याच कार्यालयात कार्यरत आहेत. एकाच टेबलावर कार्यरत असल्याने प्रशासकीय बदली करण्यामागच्या उद्देशाला बगल दिली जात असून ग्रामसेवकांच्या सेवाविषयक बाबीत अनेकदा हस्तक्षेप करित असल्याच्या तक्र ारी संघटनेला मिळाल्या आहेत. त्यामुळे वरिष्ठ सहायक पदलमवार यांना बदलीच्या ठिकाणी तत्काळ कार्यमुक्त करण्यात यावे या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २९ जुलै रोजी ग्रामसेवक संघटनेने दिले आहे. त्या निवेदनाला १५ दिवसांचा कालावधी लोटूनही पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी केराची टोपली दाखविली आहे.