मोटारपंपांना १६ तास अखंडित वीजपुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:25 AM2021-04-03T04:25:14+5:302021-04-03T04:25:14+5:30
सडक-अर्जुनी : उन्हाळी धानाला आता पाण्याची गरज असल्याने, परिसरातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांना १६ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा, अशी ...
सडक-अर्जुनी : उन्हाळी धानाला आता पाण्याची गरज असल्याने, परिसरातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांना १६ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना निवेदन दिले आहे.
धानाचे पीक पोटरीत असताना, या अवस्थेत पिकाला पाण्याची आवश्यकता असते, परंतु महावितरणकडून डव्वा परिसरातील गावांना फक्त ८ तास वीजपुरवठा होतो. शेतकरी अगोदरच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यात आता हाताशी आलेले पीक लोडशेडिंगमुळे वाळण्याच्या अवस्थेत आहे. परिणामी, ३० मार्च रोजी डव्वा येथील वीज केंद्रावर परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले होते. त्यात आता धान पिकांसाठी मोटारपंपा ना १६ तास अखंडित वीजपुरवठा व्हावा, याकरिता डव्वा येथील शेतकऱ्यांनी आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांना निवेदन देऊन, यावर संबंधित विभागाशी बोलणी करून न्याय देण्याची मागणी केली आहे. यावर आमदार चंद्रिकापुरे यांनी लगेच कार्यकारी अभियंत्यांना फोन करून १६ तास वीजपुरवठा करण्यास सांगितले.