मनोरा गावात टँकरने पाणी पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 01:13 AM2017-08-18T01:13:30+5:302017-08-18T01:13:55+5:30

पाणीटंचाईग्रस्त मनोरा गावातील १४ पैकी ११ विहिरी आटलेल्या असून भर पावसाळ्याच्या दिवसातही पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे.

 Provide water through tanker at Manora village | मनोरा गावात टँकरने पाणी पुरवा

मनोरा गावात टँकरने पाणी पुरवा

googlenewsNext
ठळक मुद्देपाणीटंचाईची समस्या : प्रफुल्ल पटेल यांचे जिल्हाधिकाºयांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : पाणीटंचाईग्रस्त मनोरा गावातील १४ पैकी ११ विहिरी आटलेल्या असून भर पावसाळ्याच्या दिवसातही पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. अशा बिकट प्रसंगी प्रशासनाने त्वरित टँकरने पाण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मनोरा ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या सभेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी जिल्हाधिकाºयांना भ्रमणध्वनीवर दिले.
तिरोडा तालुक्यातील सरांडी जि.प. क्षेत्रात येणाºया मनोरा गावातील विहिरी कोरड्या पडल्यामुळे पिण्याच्या पाण्याची दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या गावास राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या वेळी सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी आपल्या व्यथा सांगितल्या. मागील दोन महिन्यांपासून मनोरा, सेलोटपार, मुरमाडी, खैरी, मुरपार, नवेगाव, केसलवाडा, बयेवाडा, खोपडा या गावांत पाऊस अत्यंत कमी प्रमाणात पडला. त्यामुळे धान पिकाच्या फक्त १० ते १५ टक्के रोवण्या झालेल्या आहेत. यंदा दुष्काळ निश्चित आहे. उन्हाळ्यात मनोरा गावात नेहमीच पाणी टंचाई असते. मात्र यंदा पाऊस नसल्याने गावातील विहिरी आटलेल्या असून पिण्याच्या पाण्याकरिता १ किमीपर्यंत पायपीट करावी लागते.
खा. प्रफुल्ल पटेल यांनी गावातील अनेक विहिरी प्रत्यक्ष पाहिल्या व ग्रामस्थ महिलांशी चर्चा केली. उपस्थित तहसीलदार संजय रामटेके व खंड विकास अधिकारी इनामदार यांच्यावर रोष व्यक्त करीत खडेबोल सुनावले. प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईबाबद नाराजी व्यक्त केली.
ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावकºयांना संबोधित करताना पटेल म्हणाले, गावाच्या अशा बिकट प्रसंगी ते सोबत असून या प्रसंगातून मार्ग काढण्याकरिता ते सर्वतोपरी प्रयत्न करतील. तहसीलदारांच्या भ्रमणध्वनीवर जिल्हाधिकाºयांशी त्यांनी या वेळी चर्चा केली.
गोंदिया जिल्हा टँकरमुक्त असल्याचा देखावा करू नका. मनोरा व परिसरातील गावांची प्रत्यक्ष पाहणी करा. पाणी टंचाईग्रस्त मनोरा गावात त्वरित टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा, असे निर्देश त्यांनी दिले.
तिरोडा तालुक्यात यंदा आतापर्यंतच्या पावसाची स्थिती पाहता दुष्काळ पडणार, हे स्पष्ट दिसत आहे. आता पाऊस पडला तरी पीक होणे कठिण आहे. ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील पावसाचे पाणी व धानाच्या रोवणीची अवस्था चांगली नाही. गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी त्यांनी केली. माजी आ. दिलीप बन्सोड, जि.प. सदस्य, पं.स. सभापती, सदस्य व मुख्य कार्यकर्त्यांना त्यांनी मनोरावासीयांच्या मदतीकरिता प्रशासनाचा पाठ पुरावा करण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी माजी आ. दिलीप बन्सोड, माजी जि.प. उपाध्यक्ष पंचम बिसेन, पं.स. सभापती उषा किंदरले, जि.प. सदस्या सुनिता मडावी, सरपंच लता पेशने, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, माजी जि.प. सदस्य प्रेमकुमार रहांगडाले, देवेंद्रनाथ चौबे, माजी पं.स. सदस्य संजय किंदरले, पं.स. सदस्य जया धावडे, मनोहर धार्मिक, महेंद्र मारवाडे, लिलाधर तिडके, विनायक सोनेवाने, विनोद पेशने, सुभाष वाघाडे, गोपिका मारवाडे, कांता कावळे, ममता पेशने व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title:  Provide water through tanker at Manora village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.