‘एलईडी व्हॅन’ करणार ३५० गावांत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 09:46 PM2017-12-10T21:46:10+5:302017-12-10T21:46:29+5:30
वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम व्हावे व त्यांचा वापर व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ‘एलईडी व्हॅन’च्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम व्हावे व त्यांचा वापर व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ‘एलईडी व्हॅन’च्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. सोमवारी (दि.११) दुपारी १२ वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ करतील.
मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एच. ठाकरे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे, महिला व बालकल्याण समिती सभापती विमल नागपुरे, समाजकल्याण समितीचे सभापती देवराज वडगाये, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती छाया दसरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) सुधील वाळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) आर.व्ही. राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश बागडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख याप्रसंगी उपस्थित राहतील.
जिल्ह्यात ३५० एलईडी व्हॅनच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत विविध चित्रफिती दाखवून जनजागृती करण्यात येणार आहे. याच चित्रफितीतून शेतपिकांवर लागणाºया विविध रोगांवर नियंत्रण मिळविण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर एलईडी व्हॅन गोंदिया तालुक्यातील दवनीवाडा, दांडेगाव, तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा, सरांडी, बेलाटी बु., मांडवी, आमगाव तालुक्यातील गोरठा, धावडीटोला, ठाणा या गावांत जनजागृती करणार आहे.