मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:18 AM2021-07-23T04:18:49+5:302021-07-23T04:18:49+5:30
या कार्यक्रमाला राऊंड ऑफिसर संजय पटले, वनरक्षक बागडकर, पंचायत समितीच्या माजी सदस्य अल्का काठेवार प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी पटले ...
या कार्यक्रमाला राऊंड ऑफिसर संजय पटले, वनरक्षक बागडकर, पंचायत समितीच्या माजी सदस्य अल्का काठेवार प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी पटले यांनी, जंगलालगतच्या गाव परिसर व शेतात लाईट लावावे, घरा भोवतालचे झुडूप साफ करावे, घरातील कचरा उघड्यावर न टाकता व्यवस्थित व्यवस्थापन करावा, रात्रीला शेतात जाताना टॉर्च व काठी सोबत ठेवावी, पहाटे व सायंकाळी जंगल परिसरात वावरणे टाळावे, एकट्याने बाहेर जाऊ नये, जंगल परिसरात व उघड्यावर शौचास जाऊ नये व वन्यजिवांसोबतचे संघर्ष टाळण्यासाठी मदत करा, असे आवाहन केले. संचालन गराडा येथील मुख्याध्यापक आनंद गौपाले यांनी केले. आभार जांभूळपाणी येथील मुख्याध्यापक रमेश बिसेन यांनी मानले. कार्यक्रमासाठी वन विभागाच्या कर्मचारी व गावकऱ्यांनी सहकार्य केले.