विधी साक्षरता अभियानांच्या माध्यमातून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:33 PM2017-11-24T22:33:49+5:302017-11-24T22:34:00+5:30
नालसा योजनेंतर्गत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंदिया यांच्या मार्गदर्शनात तालुका विधी सेवा समिती तिरोडाद्वारे १० दिवसांपर्यंत तालुक्यातील विविध ठिकाणी विधी साक्षरता अभियान राबवून जनजागृती करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : नालसा योजनेंतर्गत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंदिया यांच्या मार्गदर्शनात तालुका विधी सेवा समिती तिरोडाद्वारे १० दिवसांपर्यंत तालुक्यातील विविध ठिकाणी विधी साक्षरता अभियान राबवून जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमात तिरोडा तालुक्यातील शाळा-महाविद्यालये, अदानी पॉवर प्लांट, ग्रामपंचायत धादरी व ठाणेगाव येथील महाविद्यालयांमध्ये विविध मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रमात महिला, मुले, जेष्ठ नागरिक व कामगारांच्या अधिकाराबाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्यात आले.
तालुका विधी सेवा समितीतर्फे या अभियानात एकूण ११ कार्यक्रम घेण्यात आले. पोलीस ठाणे तिरोडा येथे कैद्यांचे अधिकार व जमानत तसेच सायबर गुन्हे या विषयावर माहिती देण्यात आली. अदानी पॉवर प्लांटमध्ये कामगारांचे अधिकार व विमा योजनेबाबत माहिती देण्यात आली. तसेच तहसील कार्यालय व ग्रामपंचायत धादरी येथे मोफत विधी सहायता व बँकेच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वसतिगृह, शाळा- महाविद्यालयांमध्ये नागरिकांचे अधिकार, विद्यार्थ्यांचे अधिकार व मानवाधिकारांबाबत माहिती देण्यात आली. शासकीय रुग्णालयात विधी सहायता व व्यसनमुक्तीबाबत शिबिर घेण्यात आले. सदर अभियानाच्या समारोपाबाबत तालुका विधी सेवा समितीतर्फे तिरोडा शहरात पथसंचलन करण्यात आले होते. सदर रॅलीमध्ये न्यायाधीश, सर्व वकील वर्ग, न्यायालयाचे कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यानी व्यसनापासून व सायबर गुन्ह्यांपासून परावृत्त व्हावे, कामगार व शेतकºयांनी त्यांच्यासाठी असलेल्या कायद्यांचा व योजनेचा लाभ घ्यावा. नागरिकांनी विधी सेवा समितीतर्फे देण्यात येणाºया मोफत सहाय्यता व सल्ला केंद्राचा उपभोग घ्यावा, असे आवाहन तिरोडा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश वि.प्र. खंदारे यांनी केले. कार्यक्रमांसाठी न्यायाधीश आर.डी. भुयारकर, न्यायाधीश डी.के. शाहुल, न्यायाधीश प्र.चु. बच्छेले यांनी मार्गदर्शन करुन नागरिकांना विधी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या उपक्रमात तालुका वकील संघाचे अध्यक्ष भांडारकर, उपाध्यक्ष हरिणखेडे, सचिव शेंडे, वरिष्ठ वकीलवर्ग यादव, मलेवार, गंगापारी, पारधी, पी.आर. भांडारकर, माधुरी रहांगडाले, वासनिक व इतर वकील मंडळीनी विविध कायदे व अधिकार या विषयावर नागरिकांना मार्गदर्शन केले.