महिला मेळाव्यातून जनजागृती
By admin | Published: January 25, 2017 01:39 AM2017-01-25T01:39:55+5:302017-01-25T01:39:55+5:30
देवरीसारख्या आदिवासी नक्षलग्रस्त व अतिदुर्गम तालुक्यातील महिलांना एकत्रित करून त्यांना समाजप्रबोधन
महिलांची उपस्थिती : मिसपिरी येथे जिल्हा महिला काँग्रेसचा कार्यक्रम
देवरी : देवरीसारख्या आदिवासी नक्षलग्रस्त व अतिदुर्गम तालुक्यातील महिलांना एकत्रित करून त्यांना समाजप्रबोधन व जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील मिसपीरी येथे महिला मेळावा घेण्यात आला. यात महिलांना समाजप्रबोधन करून जनजागृती करण्यात आली.
महिलांचे सामूहिक हळदी कुंकू व वाण वाटप कार्यक्रमही घेण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष तथा जि.प. सदस्य उषा शहारे होत्या. याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. सदस्य माधुरी कुंभरे, उपसभापती संगीता भेलावे, पं.स. सदस्य लखनी सलामे यांच्यासह परिसरातील शेकडो महिला उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी महिलांना हळदी कुंकू व वाण वाटप करून समाजप्रबोधन केले. प्रास्ताविक व संचालन तालुका अध्यक्ष सुषमा घरत यांनी केले. उपस्थितांचे आभार उषा बन्सोड यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)