शहरात आजपासून जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 05:00 AM2020-09-13T05:00:00+5:302020-09-13T05:00:11+5:30
आजघडीला शहरातील एकही परिसर कोरोना रूग्णांपासून सुटलेला नाही. त्यातल्या त्यात बाजारपेठेतही रूग्ण सातत्याने वाढत आहेत. विशेष म्हणजे, यानंतरही शहरात गर्दी काही कमी होत नसून त्यात बाजारपेठेतील गर्दी बघितल्यास कोरोना गोंदियातून निघून गेल्यासारखे बिनधास्तपणे नागरिक फिरताना दिसतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात झपाट्याने वाढत असून आता दररोज १५० पेक्षा जास्त रूग्णांची वाढ होत आहे. यात सर्वाधिक रूग्ण गोंदिया शहरात निघत आहेत. शहरातील स्थिती गंभीर रूप धारण करीत असतानाच प्रामुख्याने बाजारातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी शहरातील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी रविवारपासून (दि.१३) जनता कर्फ्यू पुकारला आहे. या स्वयंस्फुर्त जनता कर्फ्यूमध्ये विविध व्यापारी संघटना आपले समर्थन देत पुढे येत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील कोरोना बाधितांची संख्या दररोज झपाट्याने वाढत आहे. त्यात गोंदिया शहरातील कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक असून धडकी भरणारी स्थिती आता शहरात निर्माण झाली आहे. आजघडीला शहरातील एकही परिसर कोरोना रूग्णांपासून सुटलेला नाही. त्यातल्या त्यात बाजारपेठेतही रूग्ण सातत्याने वाढत आहेत. विशेष म्हणजे, यानंतरही शहरात गर्दी काही कमी होत नसून त्यात बाजारपेठेतील गर्दी बघितल्यास कोरोना गोंदियातून निघून गेल्यासारखे बिनधास्तपणे नागरिक फिरताना दिसतात.
शहरातील रूग्ण वाढीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे आहे. यासाठी नागरिकांनी घराबाहेर न निघणे हाच एकमात्र पर्याय असून यासाठी जनता कर्फ्यू पुकारणे गरजेचे झाले आहे. विशेष म्हणजे, राज्यात कित्येक शहरांमध्ये आता जनता स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यू पुकारून आपल्या सुरक्षेसाठी जागृती दाखवित आहे.
हीच बाब लक्षात घेत बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. विविध व्यापारी संघटनांशी संपर्क साधून त्यांनी जनता कर्फ्यूबाबत त्यांचे समर्थन मिळवून घेतले आहे. त्यानुसार, रविवारपासून (दि.१३) शहरात जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, व्यापाºयांचा हा स्वयंस्फुर्त जनता कर्फ्यू असून येत्या २० तारखेपर्यंत हा जनता कर्फ्यू राहणार आहे.
तिरोडा शहरात ५ दिवस जनता कर्फ्यू
तिरोडा शहरात मागील आठवडाभरापासून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे येथील व्यापाºयांनी स्वत:च पुढाकार घेत कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी १३ ते १७ सप्टेंबर दरम्यान ५ दिवस संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधिचे पत्र सुद्धा व्यापारी संघटनेने नगर परिषदेला दिले आहे.
गरज वाटल्यास पुढे ७ दिवसांची वाढ
रविवारपासून (दि.१३) पुकारण्यात आलेला हा जनता कर्फ्यू पुढील रविवारपर्यंत म्हणजेच २० तारखेपर्यंत पुकारण्यात आला आहे. यादरम्यान शहरातील कोरोनाची स्थिती बघून तसेच गरज पडल्यास आणखी ७ दिवस यामध्ये वाढ केली जाणार असल्याची माहिती आहे. काही व्यापाºयांनी सर्व शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांच्या या प्रयत्नाला जास्तीत जास्त समर्थन देऊन हा जनता कर्फ्यू यशस्वी करीत गोंदियाला कोरोनामुक्त करण्यात सहकार्य करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे.
या संघटनांनी दिले समर्थन
या जनता कर्फ्यूला येथील दी गोंदिया कंजुमर्स प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूटर्स एसोसिएशन, श्री किराना तेल व्यापारी संघ, गोंदिया सराफा असोसिएशन, बर्तन असोसिएशन, पूज्य सिंधी मनिहारी एसोसिएशन, गोंदिया इलेक्ट्रीक एंड इलेक्टॉनिक्स असोसिएशन, गोंदिया थोक अनाज व्यापारी संघ, पुस्तक विक्रेता संघ, गोंदिया चिल्लर कपडा विक्रेता संघ, गोंदिया जिल्हा ईट निर्माता एसोसिएशन, गोंदिया थोक व्यापारी संघ, राईस मिसर्ल एसोसिएशन, गोंदिया चिल्लर रेडिमेड व्यापारी संघ, गोंदिया जिल्हा सॉ मिल ओनर्स एसोसिएशन, गोंदिया चिल्लर व्यापारी संघ, जैन बेकरी, गोंदिया टायर्स वर्क्स, सर्व मुद्रांक विक्रेता अर्जनविस व हस्तलेख कचहरी, मेटल मर्चेंट एसोसिएशन, श्री हलवाई होटल असोसिएशन, थोक सब्जी-फल व्यापारी संघ, गोंदिया चिल्लर किराना व्यापारी संघ, गोंदिया सायकल डिलर असोसिएशन, गोंदिया होलसेल रेडिमेड व होजियरी असोसिएशन, गोंदिया रेस्टॉरेंट असोसिएशन आदींनी आपले समर्थन दिले आहे.