कंत्राटदाराच्या दबावाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 05:00 AM2020-11-20T05:00:00+5:302020-11-20T05:00:18+5:30

रस्त्यालगत खोदून ठेवलेल्या नालीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सडक अर्जुनी येथील नागरिकांनी याची नगर पंचायत आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्याकडे तक्रार केली. मात्र यानंतरही त्यांनी याची दखल घेतल्याने संतापलेल्या नागरिकांनी अताशा आशिर्वाद बिल्डर्स व सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पण याचा सुध्दा कसलाच परिणाम झाला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे. 

Public Works Department under pressure from the contractor | कंत्राटदाराच्या दबावाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग

कंत्राटदाराच्या दबावाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग

googlenewsNext
ठळक मुद्देरस्ता बांधकामाची मुदत संपूनही काम अपूर्ण : पोलिस तक्रारीला देखील दाखविली केराची टोपली

 लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्यातील सडक अर्जुनी ते शेंडा या रस्ता बांधकामाचे कंत्राट नागपूर येथील अताशा आशिर्वाद बिल्डर्सला दिले आहे. या बांधकामाची मुदत संपूनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. याची सडक अर्जुनी येथील नागरिकांनी पोलिसात तक्रार केली. पण त्या तक्रारीला सुध्दा केराची टोपली दाखविण्यात आली. सार्वजनिक बांधकाम उपविभाग कंत्राटदारावर कारवाई करण्याऐवजी त्याच्या दबाबवाखाली येऊन या बांधकामाकडे दुर्लक्ष करीत आहे. 
अताशा आशिर्वाद बिल्डर्सला सडक अर्जुनी ते शेंडा या रस्त्याचे आणि सडक अर्जुनी ते केसलवाडा या १ किमीच्या नाली बांधकामाचे कंत्राट १२ नोव्हेंबर २०१८ रोजी देण्यात आले. नाली आणि रस्ताचे काम १४ नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण करायचे होते. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही पूर्ण केले नाही. एकूण २२ काेटी रुपयांचे हे काम आहे. यात २ किमी सिमेंट रस्ता आणि रस्त्याच्या बाजुला क्रॉंक्रीटच्या नाल्या तयार करायच्या आहेत.  दोन वर्षाचा कालावधी लोटूनही अर्धे सुध्दा काम पूर्ण करण्यात आले नाही.कंत्राटदाराकडून कधी मुरुम नसल्याचा तर कधी यंत्रसामुग्री नसल्याचे सांगत वेळ मारुन नेणण्याचा प्रयत्न करण्यात आला. सडक अर्जुनी ते केसलवाडा मार्गावर मागील वर्षभरापासून नाल्या खोदून ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. 
रस्त्यालगत खोदून ठेवलेल्या नालीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सडक अर्जुनी येथील नागरिकांनी याची नगर पंचायत आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्याकडे तक्रार केली. मात्र यानंतरही त्यांनी याची दखल घेतल्याने संतापलेल्या नागरिकांनी अताशा आशिर्वाद बिल्डर्स व सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पण याचा सुध्दा कसलाच परिणाम झाला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे. 
मुदतीत काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारावर नोटीस देऊन दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र सडक अर्जुनी उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलीच कारवाई केली नाही. एवढेच नव्हे तर कंत्राटदाराला साधी नोटीस सुध्दा बजाविण्याचे धाडस या विभागाने केले नाही, त्यामुळे या विभागाचे अधिकारी कंत्राटदाराच्या दबावाखाली कसे काम करीत आहे दिसून येते.
मुदतवाढ देण्यासाठी पत्र 
रस्ता आणि नालीचे बांधकाम अताशा आशिर्वाद बिल्डर्सने दोन वर्षांचा कालावधी लोटूनही पूर्ण केले नाही. त्यानंतर आता पुन्हा काम पूर्ण करण्यासाठी  बिल्डर्सने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज केल्याची माहिती आहे.
कंत्राटदाला वरदहस्त कुणाचा
नागपूर येथील अताशा आशिर्वाद बिल्डर्सने दोन वर्षांचा कालावधी लोटूनही अर्धे देखील काम पूर्ण केले नाही. तर यासंदर्भात वांरवार तक्रारी करुन सुध्दा कंत्राटदारावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या कंत्राटदारावर नेमका वरदहस्त कुणाचा असा सवाल उपस्थित केला जात आहे. 
आशिर्वाद बिल्डर्सला बांधकाम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना वांरवार देण्यात आल्या आहे. आता काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने मुदतवाढीचे पत्र दिले आहे. येत्या चार पाच दिवसात कामाला सुरुवात केली जाणार आहे. 
- प्रकाश लांजेवार, उपविभागीय अभियंता सडक अर्जुनी

Web Title: Public Works Department under pressure from the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.