पालकमंत्र्यांच्या हस्ते नववर्ष कॅलेंडरचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 09:38 PM2018-02-05T21:38:06+5:302018-02-05T21:38:23+5:30

Publication of new year calendar at the hands of Guardian Minister | पालकमंत्र्यांच्या हस्ते नववर्ष कॅलेंडरचे प्रकाशन

पालकमंत्र्यांच्या हस्ते नववर्ष कॅलेंडरचे प्रकाशन

Next
ठळक मुद्देपक्ष्यांसह पर्यटनस्थळांची माहिती : जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्र म

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : जिल्ह्यात जास्तीतजास्त पर्यटक व पक्षी अभ्यासक पर्यटनस्थळांना व तलावांवर येणाऱ्या स्थलांतरीत व विदेशी पक्ष्यांना बघण्यासाठी यावेत व या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी स्थलांतरीत व विदेशी पक्ष्यांची तसेच जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती असलेले सन २०१८ या नववर्षाचे बहुरंगी भित्ती कॅलेंडर जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केले आहे.
या कॅलेंडरचे प्रकाशन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते शनिवारी (दि.३) जिल्हा नियोजन समितीच्या सभेत करण्यात आले.
यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, खासदार अशोक नेते, आमदार गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, नियोजन विभागाचे उपायुक्त बकुल घाटे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे प्रामुख्याने उपस्थित होते.
गोंदिया जिल्हा जैवविविधता आणि वन्यजीवसृष्टीने समृद्ध आहे. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदियातील परसवाडा, झिलमिली, घाट्टेमणी, लोहारा, नवेगावबांध, श्रृंगारबांध, नवनीतपूर, सिरेगावबांध, सलंगटोला, बाजारटोला, कुंभारटोली व पदमपूरसह अन्य तलावांवर मध्यपूर्व एशिया, मध्य युरोप, दक्षिणपूर्व आशिया, दक्षिण व उत्तर युरोप, पूर्व चीन, सायबेरिया, मंगोलिया, अमेरिका, रशिया, फ्रांस, हॉलंड, इंडोनेशिया, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया, पाकीस्तान, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका व आखाती देशातून बार हेडेड गुज, ब्राऊन हेडेड गल, कॉम्ब डक, कॉमन टील, कॉमन पोचार्ड, परपल हेरॉन, कॉमन क्र ेन, युरेशियन स्पुन बील, ग्रे लॅग गुज, रेड क्रि स्टेड पोचार्ड, नॉर्थन शॉवेलर, व्हाईट नेक्ट स्टॉर्क यांचे बहुरंगी सचित्र त्या पक्षांचे मराठी नाव व कोणत्या देशातून हे पक्षी स्थलांतरीत होतात याबाबतची थोडक्यात माहिती या कॅलेंडरमध्ये देण्यात आली आहे.
या पक्ष्यांसह विविध प्रजातीचे ३२५ पेक्षा जास्त स्थलांतरीत व विदेशी पक्षी जिल्ह्यातील तलावांवर हिवाळ््याच्या दिवसात हमखास येतात. जिल्ह्यात असलेले हाजराफॉल, प्रतापगड, कचारगड, माँ मांडोदेवी देवस्थान, बोदलकसा जलाशय, चुलबंद प्रकल्प, संत लहरीबाबा कामठा आश्रम, नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, नागझरिा वन्यजीव अभयारण्य, भवभूतीची जन्मभूमी पदमपूर, श्रमाचे प्रतिक अर्धनारेश्वरालय, राज्यातील एकमेव तिबेटियन कॅम्प या पर्यटन व तीर्थस्थळांची थोडक्यात सचित्र माहिती या कॅलेंडरमध्ये देण्यात आली आहे. तसेच वर्षभरात प्रत्येक महिन्यात येणाºया शासकीय सुट्यासुद्धा नमूद करण्यात आल्या आहे.
कॅलेंडरच्या प्रकाशनाच्यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मांडले.

Web Title: Publication of new year calendar at the hands of Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.