पाकळ्या, यशोमन व संकल्प या पुस्तकांचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 10:20 PM2018-12-31T22:20:34+5:302018-12-31T22:20:45+5:30
शिक्षक भारतीतर्फे आयोजित ८ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी लिहिलेल्या पाकळ्या, यशोमन व संकल्प या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शिक्षक भारतीतर्फे आयोजित ८ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी लिहिलेल्या पाकळ्या, यशोमन व संकल्प या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
येथील नमाद महाविद्यालयातील सभागृहात आयोजित संमेलनात खासदार शरद पवार प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी खासदार प्रफुल्ल पटेल, मधुकर कुकडे, आमदार कपिल पाटील, प्रकाश गजभिये, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, अनिल देशमुख, राजेंद्र जैन, दिलीप बंसोड, स्वागताध्यक्ष राजेंद्र झाडे, प्रभा गणोरकर, अशोक बेलसरे, कवियत्री निरजा, अतुल देशमुख, लोककवी अल्हा म्हात्रे, जयवंत पाटील, प्राचार्य रजनी चतुर्वेदी, संमेलनाध्यक्ष वामन केंद्रे, माजी खासदार नाना पटोले, शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र सोनेवाने, विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे, प्रकाश ब्राम्हणकर, बाबा जांगडे, व्ही.डी. मेश्राम, दिलीप तडस, मिलींद रंगारी, निलम गभणे, मारुती शेरकर, रजिया बेग उपस्थित होते.
या पाहुण्यांच्या उपस्थितीत सोनेवाने यांच्या ‘पाकळ्या’ लेख संग्रह व ‘यशोमन’ कविता संग्रह तसेच यशोधरा सोनेवाने यांच्या ‘संकल्प’ लेख संग्रहाचे प्रकाशन करण्यात आला. शिक्षकच समाज व विद्यार्थ्यांना नवीन दृष्टिकोन देतो असे मत खासदार पवार यांनी व्यक्त केले.
शिक्षकांनी चांगले साहित्य लिहून समाजाला प्रबोधन द्यावे. समाजात राहणाऱ्या तळागळातील लोकांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करावे. समाजातील अंधश्रद्धा दूर करावी व प्रामाणीकपणे इतिहासाची नोंद करावी असे उद्गार संमेलनाध्यक्ष केंद्रे यांनी व्यक्त केले.