डॉक्टरवर हल्ला करणाऱ्याला शिक्षा करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:29 AM2021-04-17T04:29:00+5:302021-04-17T04:29:00+5:30
सडक-अर्जुनी : कोविड सेंटरवर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा आरोग्य संघटनेने जाहीर निषेध करून आरोपीस कठोर ...
सडक-अर्जुनी : कोविड सेंटरवर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा आरोग्य संघटनेने जाहीर निषेध करून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना स्वरक्षण मिळावे यासाठी आरोग्य संघटनेने तहसीलदार राजेश खोखले यांना निवेदन दिले.
सडक-अर्जुनीमध्ये कोरोना वायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह येथे कोरोना केअर सेंटर उघडण्यात आले. आरोपी दिनेश श्रीराम मसराम मौजा कोहमारा हे काही आपले नातेवाइकांना घेऊन कोरोना वायरसची तपासणी करण्याकरिता गेला होता. तो परत येऊन काही वेळाने पुन्हा गेला असता त्यांच्या नातेवाइकांची कोरोना चाचणी व्हायची होती, त्यामुळे आरोपीला राग आला व त्यांनी सेंटरवरील कर्मचारी भौतिक वैद्य यांना मारहाण केली. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद भुते यांना चपलानी मारहाण करून अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केली. घडलेल्या घटनेची तक्रार डुग्गीपार पोलीस स्टेशनला करण्यात आली. ठाणेदार सचिन वांगडे यांनी योग्य चौकशी करून भादंविच्या कलम ३५३, ३३२, ५०४ व ५०६ नुसार गुन्ह्याची नोंद करून आरोपी दिनेश मसराम याला अटक केली.
........
आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी
आरोपी दिनेश मसराम यांनी डॉक्टर व कर्मचारी यांचेवर केलेल्या हल्ल्यामुळे त्याला पोलीस रिमांड मिळावा, अशी मागणी दिवाणी न्यायालय सडक-अर्जुनी येथे केली असता न्यायालयांनी त्याला तीन दिवसांचे पोलीस कस्टडीचे आदेश दिले.
.....
‘कोरोना काळात आपली आरोग्यसेवा देणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणी हल्ला करीत असेल तर तो हल्ला खपवून घेतला जाणार नाही, अशा हल्लेखोरांना शिक्षा करणे गरजेचच आहे.
-सचिन वांगडे, ठाणेदार, डुग्गीपार पोलीस स्टेशन
......
‘प्रामाणिक आरोग्य सेवा करीत असताना हल्लेखोर आमच्यावरच हल्ला करीत असेल तर आमच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. मनातून काम करण्याची इच्छा राहत नाही. गुन्हेगाराला शिक्षा व्हावी हीच अपेक्षा.
-डॉ. विनोद भुते.