नियमभंग करणाऱ्यांना दंडाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 05:00 AM2020-06-08T05:00:00+5:302020-06-08T05:00:31+5:30
कोरोनाशी लढण्यासाठी देशात ‘लॉकडाऊन’चे शस्त्र उपसण्यात आले व त्यामुळे सुमारे २ महिने उद्योगधंदे व अन्य व्यवहार बंद पडून होते. परिणामी देशाला मोठ्या आर्थिक फटका सहन करीत कारभार चालवावा लागत आहे. त्यात राज्य शासनाचेही आर्थिक उत्पन्न खुंटल्याने त्यांनाही कारभार चालविण्यासाठी आर्थिक स्त्रोतांचा विचार करणे गरजेचे होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ‘लॉकडाऊन’मध्ये शिथिलता देत शासनाने काही नियमांतर्गत दैनंदिन व्यवहारांना परवानगी दिली. त्यानुसार शहरातील बाजारपेठ उघडली असून मात्र नागरिक व व्यापाऱ्यांना नियमांना बगल दिली जात आहे. अशा नागरिक व व्यापाºयांवर नजर ठेवण्यासाठी नगर परिषदेने विशेष पथकांचे गठन केले आहे. या पथकांनी आजवर २९२ नागरिक व व्यापाऱ्यांना दणका देत त्यांच्याकडून ४३ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, हे पथक बाजारपेठ व शहरावर नजर ठेवून असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. कोरोनामुळे ‘न भूतो न भविष्यती’ अशी स्थिती अवघ्या जगापुढे निर्माण झाली आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी देशात ‘लॉकडाऊन’चे शस्त्र उपसण्यात आले व त्यामुळे सुमारे २ महिने उद्योगधंदे व अन्य व्यवहार बंद पडून होते. परिणामी देशाला मोठ्या आर्थिक फटका सहन करीत कारभार चालवावा लागत आहे. त्यात राज्य शासनाचेही आर्थिक उत्पन्न खुंटल्याने त्यांनाही कारभार चालविण्यासाठी आर्थिक स्त्रोतांचा विचार करणे गरजेचे होते. अशात राज्य शासनाने ‘लॉकडाऊन’ शिथिल करीत दैनंदिन व्यवहारांना परवानगी दिली असून यासाठी काही नियम ठरवून देण्यात आहेत.
मात्र शहरातील बाजारपेठेत बघता व्यापारी व नागरिक दोघांकडूनच नियमांना तिलांजली देत वागणे सुरू आहे. यावरून शिथिलतेचा अर्थ यांनी संपूर्ण सुटका असा समजून घेतल्यासारखे वाटत आहे.
या सर्व व्यवहारांवर नजर ठेवणे गरजेचे असून अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगण्याची पाळी येऊ नये यासाठी नगर परिषदेने ३ विशेष पथकांचे गठन करून बाजारपेठेतील व्यवहारांवर नजर ठेवण्याची जबाबदारी दिली आहे.
त्यानुसार, हे पथक १९ मे पासून कार्य करीत असून आजवर २९२ जणांना दंडाचा दणका देत त्यांच्याकडून ४३ हजार रूपये या पथकाने वसूल केले आहेत. दुकानदारांना ग्राहकांची गर्दी करून घेऊ नये, ग्राहकांनी मास्क लावणे, त्यांना हँडवॉश किंवा सॅनिटायजर पुरविणे, शारिरिक अंतर ठेवणे, नोंद घेणे आदि नियमांतर्गत काम करावयाचे आहे.
तर नागरिकांनाही स्वत:ची सुरक्षा लक्षात घेत निघायचे आहे. मात्र व्यापारी व नागरिक दोघांकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याने पथक बारीक नजर ठेऊन आहे.
पथकाने अशा केल्या कारवाया
पथकाने केलेल्या कारवायांत मास्क न लावणाऱ्या २८० जणांना प्रत्येकी १०० रूपये दंड ठोठावला असून २८ हजार रूपये वसूल केले आहेत. शारीरिक अंतर पाळता ग्राहकांची गर्दी करणाºया ९ दुकानदारांना प्रत्येकी एक हजार रूपये दंड ठोठावला असून नऊ हजार रूपये वसूल केले आहेत. विनाकारण फिरणाऱ्या दोघांना प्रत्येकी ५०० रूपये दंड ठोठावला असून त्यांच्याकडून एक हजार रूपये तर होम क्वारंटाईन करण्यात आले असतानाही बाहेर फिरत असलेल्या एकाला एक हजार रूपयांचा दंड ठोठावला असून अशा एकूण २९२ कारवायांत ४३ हजार रूपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती लेखाधिकारी व पथक प्रमुख अविनाश फोफाटे यांनी सांगीतले.