मास्क न लावणाऱ्या ४१ जणांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 05:00 AM2020-04-23T05:00:00+5:302020-04-23T05:00:03+5:30

लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.याच अंतर्गत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, ट्राकिंग फोर्स, नेहरू चौक, हनुमान मंदिर सिव्हील लाईन, मामा चौक येथे बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी २१ एप्रिल रोजी सकाळी ७.४० ते ८.३० वाजताच्या दरम्यान मास्क न लावता रस्त्यावर फिरणाऱ्या ४१ लोकांवर दंडात्मक कारवाई केली.

Punitive action against 41 people who did not wear masks | मास्क न लावणाऱ्या ४१ जणांवर दंडात्मक कारवाई

मास्क न लावणाऱ्या ४१ जणांवर दंडात्मक कारवाई

Next
ठळक मुद्देशहर पोलिसांची मोहीम : नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना धडा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशात आणि राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. याला प्रतिबंध लावण्यासाठी शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणे अनिवार्य केले आहे. मात्र यानंतर अनेकजण विनाकारण घराबाहेर पडून नियमांचे उल्लघंन करीत असून मास्कचा वापर करीत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी आता मास्क न लावणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी (दि.२१) शहरातील विविध भागात पोलिसांनी मास्क न लावणाºया ४१ जणांवर दंडात्मक कारवाई केली.
लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.याच अंतर्गत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, ट्राकिंग फोर्स, नेहरू चौक, हनुमान मंदिर सिव्हील लाईन, मामा चौक येथे बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी २१ एप्रिल रोजी सकाळी ७.४० ते ८.३० वाजताच्या दरम्यान मास्क न लावता रस्त्यावर फिरणाऱ्या ४१ लोकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्यावर एकूण १३ हजार ४०० रूपये दंड आकारण्यात आला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, पोलीस हवालदार तिडके, चंदेल, पोलीस नायक अंबरवाडे, पोलीस शिपाई कापसे, कोटांगले, उराडे, पोलीस हवालदार कांबळे, कृणाल रामटेके, महसूल विभागाचे कर्मचारी राठोड, टेंभरे यांनी ही कारवाई केली. शहर पोलिसांनी मागील तीन चार दिवसांपासून शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर आणि मास्कचा वापर न करणाºयांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. मागील चार दिवसांत शंभरहून अधिक जणांवर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

मास्क न लावता दुचाकीवर तिघेजण
तिरोडा तालुक्याच्या काचेवानी येथे २१ एप्रिलच्या सायंकाळी ५.१५ वाजता एमएच ३५ एएल ४५२३ च्या चालकाने तोंडाला मास्क न लावता विनाकारण तिरोडाच्या संत रविदास वॉर्डातून फिरत असताना त्या मोटारसायकलवरील तिघांवर भादंविच्या कलम २६९, १८८, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Punitive action against 41 people who did not wear masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.