पुतळीची पाणी पुरवठा योजना सुरू होणार

By admin | Published: July 2, 2016 02:03 AM2016-07-02T02:03:23+5:302016-07-02T02:03:23+5:30

सडक अर्जुनी तालुक्यातील सलईटोला येथील पुतळी प्रादेशीक पाणी पुरवठा योजना सुरु होणार असून योजनेवर अवलंबून असणाऱ्या सर्वच गावांना नियमित...

Pupil Water Supply Scheme will be started | पुतळीची पाणी पुरवठा योजना सुरू होणार

पुतळीची पाणी पुरवठा योजना सुरू होणार

Next

जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे : पाणी टंचाईपासून होणार सुटका
शेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातील सलईटोला येथील पुतळी प्रादेशीक पाणी पुरवठा योजना सुरु होणार असून योजनेवर अवलंबून असणाऱ्या सर्वच गावांना नियमित पाणी पुरवठा केला जाईल असे शेंडा परिसरातील दौऱ्याअंती जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांनी सांगितले.
जि.प.अध्यक्ष मेंढे यांनी सालईटोला येथे करोडो रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या पुतळी प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली. ही योजना उमरझरी मध्यम प्रकल्पाशी जोडण्यात आली असून या योजनेचे पाणी शुद्धीकरण होऊन कोयलारी, पुतळी, मोहघटा, उशिखेडा, रेंगेपार व सडक अर्जुनी या गावांना मिळणार होते. मात्र नियोजनाअभावी ही योजना धुळखात पडल्याने अनेक गावांत पाणी समस्या उद्भवली.
शासन मनुष्याच्या जिवनावश्यक गरजांच्या पुर्तीसाठी करोडो रुपये खर्च करते. परंतु अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षित कारभाराने चांगल्या योजनांची वाट लागते. पाणी समस्या व धूळ खात पडलेल्या योजनांना पूर्ववत सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री निधीतून ७० लाख रुपये जिल्हा परिषदेकडे आले आहेत. त्याच निधीतून पुतळी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात येईल. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार असा विश्वास त्यांनी दर्शविला.या दौऱ्यादरम्यान मेंढे यांनी शेंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय व मसरामटोला येथील धान खरेदी केंद्राला भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत अभियंता निमजे, जि.प.सदस्य सरीता कापगते, विलास कापगते, रतन डोंगरवार व वामन लांजेवार उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Pupil Water Supply Scheme will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.