उन्हाळी धान खरेदीसाठी ८८ खरेदी केंद्र सुरु
By admin | Published: May 21, 2017 01:49 AM2017-05-21T01:49:53+5:302017-05-21T01:49:53+5:30
किमान आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत सन २०१६-१७ च्या रब्बी हंगामासाठी केंद्र शासनाने भरड धान्याचे व भाताचे विनिर्देश तसेच किमान
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : किमान आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत सन २०१६-१७ च्या रब्बी हंगामासाठी केंद्र शासनाने भरड धान्याचे व भाताचे विनिर्देश तसेच किमान आधारभूत किंमती जाहीर केल्या आहेत. आधारभूत किंमतीचा लाभ शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने खरेदी अभिकर्ता म्हणून गैरआदिवासी क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ भंडारा व जिल्हा पणन अधिकारी गोंदिया यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. उन्हाळी पिकाच्या धान खरेदीसाठी ८८ केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
जिल्हा मार्केटींग अधिकारी यांच्या अंतर्गत शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेंंतर्गत ५७ उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये गोंदिया तालुक्यात गोंदिया, टेमनी, गिरोला, कटंगीकला, रतनारा, दासगाव, काटी, अदासी, कामठा, नवेगाव/ धापेवाडा, रावणवाडी, मजितपूर, कोचेवाही व आसोली. गोरेगाव तालुक्यात गोरेगाव, कालीमाटी, तिमेझरी, गणखैरा, कु-हाडी, चोपा, तेढा, दवडीपार, कवलेवाडा, मोहगाव(तिल्ली), तिरोडा तालुक्यात चिरेखानी, पांजरा, वडेगाव, नवेझरी, विहीरगाव, बघोली, भिवापूर, ठाणेगाव, तिरोडा, मुंडीकोटा, चिखली व मेंढा, आमगाव तालुक्यात आमगाव, गोरठा व कालीमाटी, सालेकसा तालुक्यात कोटजंभोरा, सडक-अर्जुनी तालुक्यात पांढरी, सौंदड, मुरपार, ब्राम्हणी, हेटी व धानोरी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात अर्जुनी-मोरगाव, नवेगावबांध, महागाव, बोंडगावदेवी, वडेगाव, बाक्टी, धाबेटेकडी, भिवखिडकी, आदिवासी विकास महामंडळांतर्गत ३१ उन्हाळी धान केंद्र सुरु करण्यात आले आहेत. यात देवरी तालुक्यात आंबोरा, बोरगाव, डवकी, पालांदूर, सालेकसा, दर्रेकसा, सावली, पुराडा, चिचगड, लोहारा, चिचेवाडा, सालेकसा तालुक्यात साखरीटोला, लोहारा, पिपरीया, मक्काटोला, अर्जुनी मोरगाव तालुक्यात गोंठणगाव, केशोरी, ईळदा, बाराभाटी, धाबेपवनी, पांढरवानी, सडक-अर्जुनी तालुक्यात डोंगरगाव, कनेरी, चिखली, कोहमारा, सडक/ अर्जुनी, डव्वा, दल्ली व कोयलारी असे एकूण ८८ आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. तरी धान उत्पादक शेतकऱ्यांनी आपला धान या खरेदी केंद्रावर विक्री करावा व शासनाच्या आधारभूत किमंतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे.