पूर्णा पटेल देणार कार्यकर्त्यांना नवचेतना

By Admin | Published: March 3, 2016 01:48 AM2016-03-03T01:48:07+5:302016-03-03T01:48:07+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाद्वारे युवक राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस व पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक गुरूवारी (दि.३) गोंदिया शहर व गोंदिया तालुक्यात होणार आहे.

Purna Patel to give party workers a new twist | पूर्णा पटेल देणार कार्यकर्त्यांना नवचेतना

पूर्णा पटेल देणार कार्यकर्त्यांना नवचेतना

googlenewsNext

राष्ट्रवादीचे आज : विविध ठिकाणी कार्यक्रम
गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाद्वारे युवक राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस व पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक गुरूवारी (दि.३) गोंदिया शहर व गोंदिया तालुक्यात होणार आहे. पूर्णा प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली विविध ठिकाणी या बैठकी होणार आहेत.
दुपारी २ वाजता निवासस्थान बगिचा, रामनगर येथे गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस, शहर युवक राष्ट्रवादी व शहर विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. सायंकाळी ४.३० वाजता गोंदिया तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कुडवा येथे मार्गदर्शन करणार आहे. यात जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, जिल्हा युवक अध्यक्ष किशोर तरोणे, जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष केतन तुरकर उपस्थित राहतील.
४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आ. राजेंद्र जैन यांनी निवड केलेल्या सडक-अर्जुनी तालुक्यातील आदर्श ग्राम डव्वा येथे वाचनालयाचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमासोबतच दुपारी २ वाजता नवेगावबांध येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात अर्जुनी-मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी तथा विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक व सत्कार कार्यक्रमाला पूर्णा पटेल उपस्थित राहणार आहे. ४ वाजता कोहमारा येथे सडक-अर्जुनी तालुका राष्ट्रवादी कार्यकर्ता बैठक, तर दि. ५ ला सायंकाळी ४ वाजता तिरोडा येथे शहर, तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता बैठकीला संबोधित करणार आहे. या बैठकींना जिल्हा परिषद, नगर परिषद व पंचायत समिती सदस्य, सहकार क्षेत्राचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच युवक राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले.

Web Title: Purna Patel to give party workers a new twist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.