जंगलाला रोजगाराचे साधन करण्याचे उद्दिष्ट

By admin | Published: June 27, 2017 01:06 AM2017-06-27T01:06:15+5:302017-06-27T01:06:15+5:30

गोंदिया हा वनाच्छादित जिल्हा आहे. ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनतर्फे राज्यात १२.५ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

The purpose of the forest employment tool | जंगलाला रोजगाराचे साधन करण्याचे उद्दिष्ट

जंगलाला रोजगाराचे साधन करण्याचे उद्दिष्ट

Next

परिणय फुके : ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनच्या वृक्षदिंडीचा स्वागत समारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया हा वनाच्छादित जिल्हा आहे. ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनतर्फे राज्यात १२.५ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यत गेल्या काही वर्षापासून उष्णतेत वाढ होत असल्यामुळे जिल्ह्यातील वृक्ष लागवड करुन या उष्णतेला कमी करणे गरजेचे झाले आहे. मात्र वृक्ष लावनेच गरजेचे नसून त्यांचे संगोपन करणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. एक वृक्ष दिवसाला २१ हजार रुपये किंमतीच्या टँकची आॅक्सीजन देतो असे सिद्ध झाले आहे.
पर्यावरणाची परतफेड करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अख्या महाराष्ट्रात २५ टक्के वनक्षेत्र असून त्याला ३३ टक्के करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट शासनाने ठरविले असून या वनापासून रोजगार निर्मिती करण्याचे शासनाने ठरविले आहे. पुढील काळात वन हे रोजगाराचे साधन असण्याचे शासनाचे प्रयत्न राहणार असे प्रतिपादन डॉ. परिणय फुके यांनी केले.
१ जुलै ते ७ जुलै या कालावधीत चार कोटी वृक्षारोपण करण्याची मोहीम महाराष्ट्र शासनाच्यावतीने हाती घेण्यात आली आहे. या प्रसंगी वृक्षदिंडी काढण्यात येत आहे. याप्रसंगी गोंदिया वनविभागाद्वारे स्थनिक जयस्तंभ चौकात ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनच्या वृक्षदिंडीचा स्वागत समारंभ व वनमहोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार अनिल सोले, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, न.प. उपाध्यक्ष शिव शर्मा, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, बबलू मेश्राम, भाजप शहर अध्यक्ष सुनील केलनका आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार फुके यांनी, वनक्षेत्रात वाढ झाल्यास त्याचे अनेक फायदे भविष्यात दिसून येणार. आतापर्यंतच्या शासनाच्या धोरणात इंडस्ट्री आणून रोजगाराचे स्वप्न दाखविले जात होते. मात्र यात अपयशच आले आहे. करिता शासनाने जंगलक्षेत्रात वाढ करुन यापासून रोजगार निर्मिती करण्याची मोहीम सुरू करण्याचे ठरविले आहे.
जंगलापासून जास्त लोकांना रोजगार मिळू शकतो आणि यात खर्चही इंडस्ट्री उभारण्याच्या तुलनेत कमी येणार आहे. याकरिता लोकांना प्रशिक्षण देवून रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. लोक इंडस्ट्री पाहून आनंदी होत नाही मात्र जंगलाला पाहून आनंदी होतात याकरिता पुढे जंगलात रोजगार निर्मितीचे शासनाने ठरविले असल्यचेही सांगीतले.

Web Title: The purpose of the forest employment tool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.