परसटोलाच्या पडीत जमिनीवर फुलणार शेती

By admin | Published: October 10, 2016 12:29 AM2016-10-10T00:29:23+5:302016-10-10T00:29:23+5:30

महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मध्ये निवड करण्यात

Pushtola undergraduate farming on the ground | परसटोलाच्या पडीत जमिनीवर फुलणार शेती

परसटोलाच्या पडीत जमिनीवर फुलणार शेती

Next

जल संधारणातून मिळाले ३७७.२० : जलयुक्त शिवार अभियानातून १२०.०४ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध
नरेश रहिले ल्ल गोंदिया
महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मध्ये निवड करण्यात आलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या परसटोला येथील खडकाळ जमीनीवर भरघोस पिक घेता येणार आहे. या गावातील ९० टक्के पडीत जमीन आहे. या गावात जलसंधारणाने ३७७.२० व जलयुक्त शिवार अभियानातून १२०.०४ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध झाले आहे.
अभियानांतर्गत गावात तहसील कार्यालयाच्या माध्यामतून मृदा व जल संधारणाचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. यात भात खाचर पुनर्जीवन, नाला खोलीकरण, बोडी दुरूस्ती, सीमेंट नाला बांध, जुने सीमेंटबांध, मामा तलावातील गाळ काढणे हे अनेक जलयुक्त शिवार अभियानात या गावात ३५ काम झाले आहेत.
अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या अतिदुर्गम परसटोला गावाची लोकसंख्या १२८४ आहे. नागरिकांची उपजिविका शेतीवर अवलंबून आहे. खरीप व उन्हाळी धानाची शेती, रबीत कडधान्याची शेती करण्यात येते. गावाच्या भौगोलीक क्षेत्र ११४२.८३ हेक्टर एवढे आहे. यापैकी १८०.२९ हेक्टरमध्ये खरीप पीके घेतली जातात. परंतु आता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वाहून जाणाऱ्या पाण्याला अडविल्याने सिंचन क्षेत्र वाढले आहे. गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषि विभागाने भात खाचर पुनर्जीवन चे १८, नाला खोलीकरणाचे ८, सीमेंट नाला बांध ३, जुने सीमेंट बांध व मामा तलावाचे खोलीकरण५, बोडी दुरूस्ती १ काम झाला आहे. जल संधारणाच्या सीमेंट नाला बांधमधून ५२ टीसीएम, नाला खोलीकरणातून २८ टीसीएम, बोडी दुरूस्तीतून ०.४० टीसीएम, भात खाचर पुनर्जीवनातून ४० टीसीएम पाणी जमा झाले आहे. गावातील म्हशी व नागरिकांना ४०२.९४ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज असते. परंतु जून्या जलसंधारणामुळे ३७७.२० दशलक्ष घनमीटर पाणी जमा झाला आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामामधून १२०.०४ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध झाला आहे. गाव प्रगतीच्या वाटेवर आहे.

कोरड्या विहिरींना
मिळाले जीवन
४जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जमा झालेल्या पाण्यामुळे नाल्याच्या जवळ शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांनी नर्सरी लावल्या आहेत. पावसाने दडी मारताच काही शेतकऱ्यांनी धानासाठी नाल्याच्या पाण्याचा वापर केला. जलयुक्त शिवार अभिनामुळे या परिसरातील पाण्याची पातळी वाढली आहे.कोरड्या पडलेल्या विहीरींना पाणी आले आहे. परसटोला गावात १२४.३० हेक्टर मध्ये भात खाचर पुनर्जीवनाचे काम झाले आहे. पाणी जमीनीत मूरविण्याच्या वेळी रोवणी करण्यासाठी या पाण्याचा वापर झाला. तूळ व तिळ क्षेत्र वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.

ओळखा थेंबभर
पाण्याचे महत्त्व
४अवर्षण व अनियमित पावसामुळे जलस्तर खाली जाते. पिकावरही याचा परिणाम होतो. पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. शेतीसाठी भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जातो. परंतु भूजल पुनर्भरणावर लक्ष दिले जात नाही. या स्थितीत जलयुक्त शिवार अभियान जलस्तर वाढविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. पाण्याचे महत्व ओळखून पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे.

Web Title: Pushtola undergraduate farming on the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.