रिक्त पदे त्वरीत भरा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:35 AM2021-08-18T04:35:06+5:302021-08-18T04:35:06+5:30
गोंदिया : माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय, अधीक्षक वेतन पथक (माध्य.) कार्यालय, अधीक्षक वेतन पथक (प्राथ.) कार्यालय आणि वरिष्ठ लेखा ...
गोंदिया : माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय, अधीक्षक वेतन पथक (माध्य.) कार्यालय, अधीक्षक वेतन पथक (प्राथ.) कार्यालय आणि वरिष्ठ लेखा परीक्षण कार्यालयातील पदांना मंजुरी देऊन रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीने केली आहे. यासाठी शिक्षक आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविले आहे.
तब्बल २० वर्षांपासून या कार्यालयांतील पदे रिक्त असून शासनाने या पदांना मंजुरीच दिलेली नाही. जिल्हा शिक्षण विभागात फक्त शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी ही दोनच पदे भरलेली आहेत. इतर सर्व पदे मंजूर नसल्यामुळे रिक्त आहेत. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांची कामे कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे शासनाने लक्ष द्यावे म्हणून या मागणीचे निवेदन भाजप शिक्षक आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नयना गुंडे यांना दिले आहे. निवेदन देताना अरुण पारधी, संयोजक लीलेश्वर बोरकर, सहसंयोजक दिनेश कोहळे, सतीश मंत्री, चरणदास डहारे, सनत मुरकुटे, दुधराम राऊत, बी. पी. बिसेन, सुरेश परशुरामकर, जनता शिक्षक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण आंधळे, कोटांगले उपस्थित होते.