जीर्ण इमारत त्वरीत पाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:11 AM2017-11-17T00:11:52+5:302017-11-17T00:12:02+5:30
मुख्य बाजारपेठेतील जुन्या गांधी चौकातील सुमारे शंभर वर्षे जुन्या जीर्ण झालेल्या बीडी कारखाना इमारतीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून सदर इमारत त्वरित पाडण्यात यावी,....
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : मुख्य बाजारपेठेतील जुन्या गांधी चौकातील सुमारे शंभर वर्षे जुन्या जीर्ण झालेल्या बीडी कारखाना इमारतीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून सदर इमारत त्वरित पाडण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी नगर पालिकेला निवेदन देऊन केली आहे.
सदर इमारत गांधी वॉर्डात न.प. मालमत्ता क्रमांक २२५३ असून या इमारतीत बीडी कारखाना सुरु आहे. इमारतीच्या उत्तरेस स्टेशन रोड आहे. मुख्य बाजारपेठ असल्याने या परिसरात नेहमीच गर्दी असते. इमारतीच्या मागील बाजूस गांधी वॉर्डातील रहिवाशांना जाण्या-येण्याचा रस्ता आहे. परिसरात चार शाळा असल्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थ्यांची नेहमीच वर्दळ असते. या जीर्ण झालेल्या इमारतीचे बांधकाम माती, विटांचे असून लाकुड फाटा व कवेलूचा वापर करुन करण्यात आले आहे.
भिंतीना भेगा पडलेल्या असून इमारत केव्हाही पडून मोठी घटना घडू शकते. या शिवाय या इमारतीत तंबाखू व तेंदूपत्ताचे गोडावून आहे. येथे तंदूर भट्टी लावण्यात येते. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून नागरिकांना श्वसनाच्या आजाराचा त्रास होतो.
महाराष्टÑ नगर परिषद अधिनियम १९६५ नुसार सदर इमारत पाडण्यात यावी. अशी मागणी करणारे निवेदन नागरिकांनी ३१ मार्च २०१६, २९ सप्टेंबर २०१७ व २४ आॅक्टोबर २०१७ ला न.प. मुख्याधिकाºयांना निवेदन देवून केली. नगर पालिकेने सदर इमारत जीर्ण व धोकादायक असल्याचे मान्य केले. मात्र अद्यापही ही इमारत पाडण्यासंदर्भात कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे न.प. मुख्याधिकारी विजय देशमुख यांची भेट घेवून नागरिकांच्या शिष्टमंडळाने त्वरीत इमारत न पाडल्यास या विरोधात तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.