नुकसानभरपाईचे अनुदान त्वरित जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 09:56 PM2018-06-21T21:56:50+5:302018-06-21T21:56:50+5:30

मागील वर्षी अत्यल्प पाऊस आणि कीडरोगांच्या प्रादुर्भावाने गोंदिया तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले होते. बोटावर मोजण्याएवढ्या काही शेतकऱ्यांना वगळता सर्वच शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा सामना करावा लागला.

Quickly submit compensation compensation | नुकसानभरपाईचे अनुदान त्वरित जमा करा

नुकसानभरपाईचे अनुदान त्वरित जमा करा

Next
ठळक मुद्देशेतकरी त्रस्त : विनोद अग्रवाल यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील वर्षी अत्यल्प पाऊस आणि कीडरोगांच्या प्रादुर्भावाने गोंदिया तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले होते. बोटावर मोजण्याएवढ्या काही शेतकऱ्यांना वगळता सर्वच शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा सामना करावा लागला. अद्याप याची नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी त्रस्त आहेत. सदर नुकसान भरपाई त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केली आहे.
दुष्काळी परिस्थितीला जाणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळण्यात आले असून ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करण्यात आले.
गोंदिया तालुक्यातील एकूण ६६ हजार ८१ शेतकऱ्यांसाठी ६ हजार ८०० प्रमाणे १५ कोटी ७६ लाख ३५ हजार रुपयांचा निधी मंजूर करुन महसूल प्रशासनाला वळता करण्यात आला आहे. ते अनुदान शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात दिरंगाई न करता त्वरित जमा करण्यात यावे, यासाठी बुधवारी (दि.२०) भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी उपविभागीय अधिकारी वालस्कर यांची भेट घेवून निवेदन दिले.
मागील वर्षीचा खरीप हंगाम म्हणजे दुष्काळाचाच ठरला. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना शेतकऱ्यांच्या घरी अत्यल्प पीक आले. पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांचे शेत नापेर राहिले तर रोवणीमध्येही अडचण निर्माण झाली. शिवाय पाण्यामुळे पीक करपले. तसेच कीडरोगांमुळे धान उत्पादनावर परिणाम झाला होता.
एकंदरीत गोंदिया तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासनांची पूर्तता करीत गोंदिया जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक अनुदान मंजूर करण्यात आले. सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना पैशाची गरज आहे. यासाठी महसूल प्रशासनाने अनुदानाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावा. या मागणीला घेवून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांनी उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांची भेट घेतली. दरम्यान त्यांनी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचा निधी त्वरित जमा करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले आहे. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या इतरही समस्यांवर चर्चा केली.
यावेळी विनोद अग्रवाल यांच्यासोबत भाजपचे महामंत्री भाऊराव उके, शहर अध्यक्ष सुनील केलनका, नरेंद्र तुरकर, छत्रपाल तुरकर, रजनी नागपुरे आदी उपस्थित होते.
१५.७६ कोटी महसूल विभागाकडे
यात गोंदिया जिल्ह्यातील १५३ गावे व वाड्यातील ६६ हजार ८१ शेतकºयांना प्रति दोन हेक्टर ६ हजार ८०० याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आला. गोंदिया तालुक्यातील शेतकºयांच्या अनुदानाचा एकूण निधी १५ कोटी ७६ लाख ३५ हजार रुपये महसूल विभागाकडे वळता करण्यात आला आहे. तसे शासन निर्णय निर्गमीत करण्यात आले आहे.

Web Title: Quickly submit compensation compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी