सभापतिपदी कुरैशी दुसऱ्यांदा अविरोध
By admin | Published: September 3, 2015 01:30 AM2015-09-03T01:30:49+5:302015-09-03T01:30:49+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार सिमतीच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी काशिम जमा कुरैशी यांची दुसऱ्यांदा अविरोध निवड झाली तर उपसभापतीपदी लायकराम भेंडारकर अविरोध निवडून आले.
बाजार समिती निवडणूक : भाजपने सत्ता कायम राखली
अर्जुनी-मोरगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार सिमतीच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी काशिम जमा कुरैशी यांची दुसऱ्यांदा अविरोध निवड झाली तर उपसभापतीपदी लायकराम भेंडारकर अविरोध निवडून आले.
कृषी उत्पन्न आतार समितीच्या १९ जागांसाठी १६ आॅगस्ट रोजी मतदान घेण्यात आले. १७ आॅगस्ट रोजी झालेल्या मतमोजणीत भाजपप्रणीत १६ तर काँग्रेसप्रणीत ३ उमेदवार निवडून आले. आज सभापती, उपसभापती पदाची निवड झाली. सभापती पदासाठी काशिम जमा करैशी तर उपसभापती पदासाठी लायकराम भेंडारकर यांनी नामांकन दाखल केले. या दोन्ही पदांसाठी भाजप्रणित संचालक प्रमोद लांजेवार यांनी सुद्धा नामाकंन दाखल केले होते. त्यांनी आपले नामांकन परत घेतले. विरोधी गटातर्फे कुणीही नामांकन दाखल केले नाही. शेवटी कुरैशी व भेंडारकर यांची अविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक संजय सुरजूसे व एन.एम. जिभकाटे यांनी कामकाज पाहिले.
अविरोध निवडणूक पार पडल्यानंतर साई मंदीर येथे विजयी सभा घेण्यात आली. यावेळी माजी आ.दयादाम कामगते, जि.प.च्या उपाध्यक्ष रचना गहाणे, नामदेव कामगते, केवलराम पुस्तोडे, उमकांत ढेें, प्रकाश गहाणे, भोजू लोगडे, डॉ. गजानन डोंगरवार, रघुनाथ लांजेवार, चत्रू भेंडारकर, विजय कापगते, माणिक घनाडे, डॉ.नाजूक कुंभरे, शिवनकर व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. सभेचे संचालन डॉ.गजानन डोंगरवार यांनी केले. सभापती काशिम जमा कुरैशी यांनी आभार मानले.