तालुक्यात २०० हेक्टर क्षेत्रात रब्बी पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:30 AM2018-01-17T00:30:02+5:302018-01-17T00:30:13+5:30

यंदा अत्यल्प पाऊस व पिकांवरील रोगामुळे जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत आली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. अशात यंदा जिल्हा प्रशासनाने रब्बी पीक घेऊ नका असा फतवा काढला.

Rabbi crop in 200 hectare area of ​​taluka | तालुक्यात २०० हेक्टर क्षेत्रात रब्बी पीक

तालुक्यात २०० हेक्टर क्षेत्रात रब्बी पीक

Next
ठळक मुद्देयंदा भासणार पाणीटंचाई : रब्बी पीक न घेण्याचे आदेश फेटाळले

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा अत्यल्प पाऊस व पिकांवरील रोगामुळे जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत आली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. अशात यंदा जिल्हा प्रशासनाने रब्बी पीक घेऊ नका असा फतवा काढला. परंतु बाघनदी परिसराला लागून असलेल्या गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०० हेक्टरमध्ये रब्बी पीकासाठी नर्सरी टाकल्या आहेत.
यंदा ५० टक्केच पाऊस झाल्यामुळे जिल्ह्याची पाण्याची पातळी खालावली आहे. लोकांनी २०० मीटरपेक्षा जास्त खोल बोअरवेल खोदू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असाही इशारा देण्यात आला आहे. धानाच्या शेतीला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सिमेवरून जाणाऱ्या बाघनदीत पाणी आहे. त्या पाण्याचा वापर मध्यप्रदेशातील शेतकरी करतात. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी त्या बाघनदीच्या पाण्याचा वापर का करू नये, म्हणून तालुक्यातील नदीकाठावर शेती असलेल्या शेतकऱ्यांनी २०० हेक्टर क्षेत्रात रब्बी धानाची लागवड करण्याची तयारी दर्शविली आहे.
धापेवाडा, महालगाव, मुर्दाळा, लोधीटोला, नवेगाव, कामठा, छिपीया, बिरसी, खातिया, परसवाडा, चिरामनटोला, वडेगाव, गिरोला, नवेगावगाव या गावातील शेतकऱ्यांनी रब्बी धानासाठी नर्सरी टाकली आहे. तालुक्यात ३ हजार ७०० हेक्टर रब्बी धान पीकाचे क्षेत्र आहे. यापैकी २०० हेक्टर मध्ये रब्बी पीक घेतले जात आहे.
जलयुक्त शिवारचा थोडा आधार
सन २०१६-१७ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ७७ गावांची निवड करण्यात आली. त्या गावातील २ हजार ४९० कामे पूर्ण करण्यात आली. त्यावर ३६ कोटी २६ लाख रूपये खर्च करण्यात आले. यातून २० हजार ५४२ दसलक्ष घनमीटर पाणी साठा झाला. त्यामुळे पाण्याची पातळी आणखी खोल न जाण्यास मदत झाली. २०१७-१८ या वर्षात ६३ गावांची निवड करून ४४१ कामे सुरू झाली आहेत. जिल्ह्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी यंदा जलयुक्त शिवारचा काहीसा लाभ होणार आहे.
मामा तलाव राहिले रिते
सोळाव्या शतकात मालगुजारी तलाव तयार करण्यात आले होते. या तलावातील गाळ काढून शेतकºयांच्या शेतात नेण्याचा माणस शासनाचा होता. त्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील ४१८ मालगुजारी तलावांचा पुनरूज्जीवन कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यापैकी ३४७ तलावांची कामे सुरू केली होती होती. ११५ तलावांतील गाळ काढण्यात आला होता. या तलावांतील ६ लाख ६९ हजार ५८७ घनमीटर गाळ काढण्यात आला. परंतु अल्प पावसामुळे या तलावांमध्ये पाणीच गोळा झाले नाही.
प्रशासन हतबल
शेतकºयांना धानपीक घेऊ नका असे प्रशासन म्हणून शकत नाही, दुसरीकडे पाण्याची टंचाई आहे.अश्या परिस्थितीत धानपीक लावणाºया शेतकऱ्यांना त्यांच्या पीकासाठी अखेरपर्यंत पाणी मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतो. मग प्राशसनाकडून पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी या रबी पिकाला पाणी मिळू नये यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत. शेतकऱ्यांचे फक्त विज कनेक्शन कापल्याशिवाय किंवा मोठे भारनियम हे कारण पुढे केल्याशिवाय प्रशासनाकडे पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Rabbi crop in 200 hectare area of ​​taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.