पावसाअभावी यंदाही रब्बीचा हंगाम धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 10:02 PM2018-10-25T22:02:07+5:302018-10-25T22:02:41+5:30
शेवटच्या पाण्याने साथ न दिल्यामुळे पिकांना वाचविण्यासाठी आताही सिंचन प्रकल्पातील पाणी सोडण्याची पाळी आली आहे. परिणामी प्रकल्पांतील पाणी साठ्यात सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. अशात उन्हाळ््यातील पाण्याची गरज बघता यंदाही रब्बी हंगामासाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेवटच्या पाण्याने साथ न दिल्यामुळे पिकांना वाचविण्यासाठी आताही सिंचन प्रकल्पातील पाणी सोडण्याची पाळी आली आहे. परिणामी प्रकल्पांतील पाणी साठ्यात सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. अशात उन्हाळ््यातील पाण्याची गरज बघता यंदाही रब्बी हंगामासाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाही रब्बी हंगाम संकटात आला आहे.
मागील वर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी खरीपाचा हंगामही शेतकºयांच्या हातून गेला. तर प्रकल्पांत पाणी साठाच नसल्याने रब्बीसाठी पाणी देता आले नव्हते. एवढेच काय शहरातील पाण्याची टंचाई सोडविण्यासाठी कधी नव्हे ते पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. यंदा मात्र चांगला पाऊस बरसला.पावसामुळे जिल्ह्यात खरीपाचा हंगाम चांगला होईल अशी आशा शेतकºयांना होती. मात्र शेवटच्या एका पाण्यासाठी पीक तहानलेले असताना पावसाने दडी मारली. एका पाण्यासाठी पीक हातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. वातावरणातील बदलामुळे किड रोगांचा प्रादुर्भाव वाढला व पिकांची नुकसान झाले. मात्र पिकांना पाणी लागत असल्याने पाटबंधारे विभागाकडून आताही पाणी सोडले जात आहे.
यामुळे मात्र प्रकल्पांतील पाणीसाठाही कमी होऊ लागला आहे. असेच सुरू राहील्यास जिल्ह्यातील उन्हाळा बघता त्यासाठीही पाणी राखून ठेवणे गरजेचे आहे. असे न केल्यास उन्हाळ््यात पुन्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार यात शंका नाही. परिणामी, प्रकल्पांतील पाणीसाठा वाचवून ठेवण्यासाठी रब्बीला हंगामासाठी पाणी देता येणार नाही. मागील वर्षीही प्रकल्पांत पाणी नसल्यामुळे रब्बीला पाणी दिले नव्हते. त्यामुळे आता रब्बी हंगामासाठी जिल्हा प्रशासन काय निर्णय घेतो त्यावर हे अवलंबून राहणार.भविष्यातील पाण्याची गरज बघता रब्बीचा हंगाम धोक्यात दिसून येत आहे.
शहरासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी
मागील उन्हाळ््यात जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शहरात पाणी पेटले होते. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणक डून शहरात पाणी कपात सुरू करण्यात आली होती. यावर तोडगा म्हणून पुजारीटोला प्रकल्पातून शहरासाठी पाणी आणावे लागले होते. त्यावेळी पुजारीटोला प्रकल्पात काही प्रमाणात पाणीसाठा होता व त्यामुळेच शहराची तहान भागविता आली होती. त्यादृष्टीने यंदाही प्रकल्पात पाणी राखीव ठेवणे गरजेचे आहे. असे न झाल्यास शहराच्या पाणी समस्या काय रूप घेणार याची कल्पना न केलेलीच बरी