आमगाव व सालेकसा तालुक्यात रब्बी हंगामातील धान खरेदीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:27 AM2021-05-22T04:27:49+5:302021-05-22T04:27:49+5:30

आमगाव : तालुक्यातील बहुद्देशीय औद्योगिक सहकारी संस्थेव्दारे चैतन्य शेती साधन व कृषी बहुद्देशीय सहकारी संस्था टेकरी (कालीमाटी) अंतर्गत कटरे ...

Rabi season paddy procurement begins in Amgaon and Saleksa talukas | आमगाव व सालेकसा तालुक्यात रब्बी हंगामातील धान खरेदीला सुरुवात

आमगाव व सालेकसा तालुक्यात रब्बी हंगामातील धान खरेदीला सुरुवात

googlenewsNext

आमगाव : तालुक्यातील बहुद्देशीय औद्योगिक सहकारी संस्थेव्दारे चैतन्य शेती साधन व कृषी बहुद्देशीय सहकारी संस्था टेकरी (कालीमाटी) अंतर्गत कटरे राइस मिल कालीमाटी व वीरांगना राणी अवंतीबाई शेतकरी बहुद्देशीय सहकारी संस्था निंबा अंतर्गत मच्छिरके राइस मिल कावराबांध या खरेदी केंद्रात माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते व मार्केटिंग फेडरेशनचे महाव्यवस्थापक अतुल नेरकर यांच्या उपस्थितीत धान खरेदीला प्रारंभ करण्यात आला.

रब्बी हंगामातील धान खरेदी सुरू करण्यासंदर्भात मंगळवारी (दि.१८) खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह मुंबई येथे चर्चा केली होती. या बैठकीत या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी ३ दिवसांत धान खरेदी सुरू करण्याचे आश्वासन खा. पटेल यांना दिले होते. त्यानुसार गुरुवारपासून (दि.२०) धान खरेदीला प्रारंभ झाल्याने त्याची पूर्तता झाली आहे. जसजसे गुदामे उपलब्ध होतील तसतसे धान खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

दरम्यान, रब्बी हंगामातील धान खरेदीला सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी विजय शिवनकर, नरेश माहेश्वरी, कमलबापू बहेकार, सुखराम फुंडे, सुरेश हर्षे, बिसने, गोंडाणे, बाबूलाल बोपचे, टिकाराम मेंढे, भृगलास्तव, आशिष भुतडा, अजय भुतडा, अजय कोठारी, सुभाष यावलकर, नामदेव दोनोडे, नामदेव पागोटे, तुकडोजी रहांगडाले, लक्ष्मण नागपुरे, अजय बिसेन, संतोष रहांगडाले, श्रीखंडे, वंजारी, वासुदेव डोये, बाबुलाल दोनोडे, डोमेश्वर सोनवाने, प्रदीप रावत, संजय रावत, रमेश भुते, धनराज गिऱ्हेपुंजे, बापू भांडारकर, सयसराम मेहर, संजय हरिणखेडे, पवन चुटे, गोरेलाल पटले, मोतीलाल कटरे, डिलेश्वर सोनवाणे, तुलशीराम बिसेन, सतिष कटरे, संचालक मंडळ व बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते. उपस्थितांनी खा. पटेल व माजी आ. जैन यांचे आभार मानले.

Web Title: Rabi season paddy procurement begins in Amgaon and Saleksa talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.