विविध ठिकाणी जुगार अड्ड्यांवर धाडी
By admin | Published: October 13, 2016 01:48 AM2016-10-13T01:48:07+5:302016-10-13T01:48:07+5:30
जिल्हा पोलिसांनी सोमवारी ठिकठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्डांवर धाडी घालून २० आरोपींना अटक केली.
२० आरोपींना अटक : रोख रकमेसह मोबाईल जप्त
गोंदिया : जिल्हा पोलिसांनी सोमवारी ठिकठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्डांवर धाडी घालून २० आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून जुगारात खेळल्या जाणाऱ्या हजारो रुपयांसह अनेक मोबाईल सेट जप्त करण्यात आले.
गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आयटीआय फुलचूर पेठ येथे सोमवारी रात्री ८.३० वाजता धाड घालून भूषण सीताराम गणवीर (३५) रा. भीमनगर, संतोष भरतलाल खोब्रागडे (३५) रा. भीमनगर, मुन्ना सिताराम बोपचे (४०) रा.डव्वा, दीपक शिवनाथ कोडापे (३१) रा. फुलचूर या चौघांवर मुंबई जुगारबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई पोलिस नायक सतीश शेंडे यांनी केली. सदर आरोपी जवळून १० हजार ७७५ रुपये रोख व तीन मोबाईल जप्त करण्यात आले. दुसरी कारवाई बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाच्या बाजूला सोमवारच्या रात्री ८.३० वाजता करण्यात आली. आरोपी सुंदरसिंग मंमलसिंग नागपुरे (४२) रा. सब्जीमंडी गोंदिया व समीर पिपरराज खापेकर (३१) रा. रामनगर बाजार चौक गोंदिया हे दोघेही सट्टापट्टी घेत असताना त्यांच्याकडून ४ हजार ४०० रुपये व सट्टापट्टी घेण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. तीसरी कारवाई मालवीय वार्डाच्या कुंभारटोली येथे घडली. खुर्शिद यासीम सैय्यद (४९) रा. गौतमनगर हा सट्टापट्टी घेत असताना त्याच्याकडून ४ हजार रुपये रोख व सट्टापट्टी घेण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. शास्त्री वॉर्डातील दिनेश बकाराम कापसे (३५) हा नंगपुरा मुर्री येथे सोमवारी रात्री १०.३० वाजता सट्टापट्टी घेत असताना त्याच्याकडून २६०० रुपये रोख व सट्टापट्टी घेण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. खातीया येथील शशीकांत अनिरुद्ध मेश्राम (३१) हा सोमवारच्या रात्री ११.१० वाजता गोंदिया शहराच्या चंद्रशेखर कार्डात सट्टापट्टी घेत असताना त्याच्याकडून १८१० रुपये रोख व सट्टापट्टी घेण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
गोंदिया शहरात सोमवारच्या रात्री ९.३० वाजता सट्टापट्टी घेणाऱ्या लक्ष्मीनगरातील सनैया (४५), अजय दीपक बन्सोड (२६) रा.गढ्ढाटोली,, नरेश नत्थू गेडाम (४४) रा. कालीमंदिर गोंदिया या तीघा जवळून ४४७० रुपये रोख व तीन मोबाईल असा एकूण ७६७२ रुपयाचा माल जप्त करण्यात आला.रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रेलटोली येथे सट्टापट्टी घेणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अमीत भीमराव नंदागवळी (३०), कमलेश कार्तिक नागवंशी (२७), बखू लक्ष्मण रंगारी (६०) सर्व रा. आंबेडकर वार्ड गोंदिया, फारुक लाकूब शेख (४९) रा. फुलचूर पेठ, कलीम निजाम शेख (४३) रा. पांढराबोडी, दीपक दौलत डहाट (५८) रा. आंबेडकर वार्ड गोंदिया व शंकरलाल रामनारायण अग्रवाल रा. गोंदिया हे सोमवारच्या रात्री १० वाजता रेलटोली येथे सट्टापट्टी घेत असताना त्यांच्या जवळून ५ नग मोबाईल, २१२० रुपये रोख असा एकूण ४५७० रुपयाचा माल जप्त करण्यात आला.
शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या यादव चौक कस्तुरबा वार्डात इकराम उर्फ सद्दाम अयुब शेख (२५) हा सोमवारच्या रात्री ८ वाजता सट्टापट्टी घेत असताना पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याजवळून १६५० रुपये रोख व सट्टापट्टी घेण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. सदर आरोपींवर मुंबई जुगारबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)