गोंदिया रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी पकडले १४ लाख ७४ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 07:35 AM2021-05-25T07:35:20+5:302021-05-25T07:35:45+5:30

Gondia News गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर जनशताब्दी एक्सप्रेस मध्ये १४ लाख ७४ हजार ३०० रुपये घेऊन चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका इसमाला गोंदिया रेल्वे पोलिसांनी २४ मे च्या दुपारी रोख रकमेसह अटक केली.

Railway police seized 14 lakh 74 thousand at Gondia railway station | गोंदिया रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी पकडले १४ लाख ७४ हजार

गोंदिया रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी पकडले १४ लाख ७४ हजार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
 गोंदिया: गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर जनशताब्दी एक्सप्रेस मध्ये १४ लाख ७४ हजार ३०० रुपये घेऊन चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका इसमाला गोंदिया रेल्वे पोलिसांनी २४ मे च्या दुपारी रोख रकमेसह अटक केली. संजू मंगल बेहरा (३५)  रा. तरुण नगर कालीमाता वार्ड नंबर ३० पंडितराई रायपूर (छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गोंदिया रेल्वे पोलीस रेल्वे स्थानकावर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी फलाटावर नियमित तपासणी करीत असताना एक इसम त्यांना संशयास्पद स्थितीत साहित्य घेऊन आढळला. फलाट क्रमांक एक वर उभी असलेल्या जनशताब्दी एक्सप्रेस मध्ये तो चढण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे यांनी त्याला पकडले. तो रायपूरकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात होता. संजू बेहरा याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याच्याजवळ दोन हजार, पाचशे, दोनशे आणि शंभर रुपये दराच्या भरपूर नोटा आढळल्या. त्या नोटांची मोजणी केली असता १४ लाख ७४ हजार ३०० रुपये असल्याचे स्पष्ट झाले.

ही कारवाई रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार अरुण गोंधळे, पोलीस शिपाई ओमप्रकाश सेलुटे, नंदकिशोर नारनवरे, अखिलेश राय यांनी केली आहे. या रकमेची माहिती गोंदिया आयकर विभागाला देण्यात आली आहे.

Web Title: Railway police seized 14 lakh 74 thousand at Gondia railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.