रेल्वे स्थानक झाले एलईडीमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:44 AM2018-04-07T00:44:28+5:302018-04-07T00:44:28+5:30

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने बिलासपूर, रायपूर, नागपूर या तिन्ही मंडळातंर्गत येणाऱ्या एकूण २६० रेल्वे स्थानकांवर आणि कार्यालयांमध्ये शंभर टक्के एलईडी लाईट लावण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केली.

Railway station got LED | रेल्वे स्थानक झाले एलईडीमय

रेल्वे स्थानक झाले एलईडीमय

googlenewsNext
ठळक मुद्देवर्षाकाठी सव्वा कोटी रुपयांची बचत : पर्यावरणाचे संवर्धन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने बिलासपूर, रायपूर, नागपूर या तिन्ही मंडळातंर्गत येणाऱ्या एकूण २६० रेल्वे स्थानकांवर आणि कार्यालयांमध्ये शंभर टक्के एलईडी लाईट लावण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केली. यामुळे विजेची बचत करुन त्यासाठी वर्षाकाठी होणाऱ्या कोट्यवधी रुपयांची बचत करणे शक्य झाले आहे.
दिवसेंदिवस वीज टंचाईची समस्या बिकट होत चालली आहे. वीज टंचाईमुळे बऱ्याच भागातील नागरिकांना भारनियमनाच्या समस्येला तोंड द्यावे लागते. सर्वाधिक वीेज निर्मिती ही कोळशापासून केली जाते. मात्र कोळशाचा साठा मर्यादित असून तो केव्हा तरी संपुष्टात येईलच. वाढत्या विजेच्या वापरामुळे भविष्यात विजेच्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रात निर्माण होणाºया विजेपेक्षा मागणी अधिक असल्याने बाहेरील राज्यातून अतिरिक्त दराने वीज खरेदी करावी लागत आहे. परिणामी विजेच्या दरात सुध्दा वाढ झाली आहे. शिवाय पर्यावरणावर सुध्दा त्याचे दुष्परिणाम होत आहे. यावर सर्व गोष्टींवर मात व विजेची बचत करण्यासाठी एलईडी लाईटचा पर्याय पुढे आला. एलईडी लाईटमुळे दररोज लागणाºया विजेच्या युनिटपेक्षा कमी युनिट लागतात. त्यामुळे वीज बिलात कपात करणे शक्य आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने हीच बाब हेरून बिलासपूर, रायपूर, नागपूर या तिन्ही मंडळातंर्गत येणाºया एकूण २६० रेल्वे स्थानकांवर आणि वर्कशाप, कारखाने यासर्वच ठिकाणी शंभर टक्के एलईडी लाईट लावले. रेल्वे विभागाने पहिल्या टप्प्यात या तीन विभागातील २६० रेल्वे स्थानकावर एलईडी लाईट लावण्याचे काम देखील वेळेत पूर्ण केले. त्यामुळे रेल्वे विभागाला वर्षाकाठी विजेसाठी कराव्या लागणाºया खर्चाची बचत करणे शक्य झाले आहे.
१३ लाख ८५ हजार वीज युनिटची बचत
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने तिन्ही मंडळातील २६० रेल्वे स्थानकावर एलईडी लाईट लावल्यामुळे वर्षाकाठी १३ लाख ८५ हजार युनिट विजेची बचत करणे रेल्वे विभागाला शक्य झाले. तसेच यासाठी होणाऱ्या १ कोटी १८ लाख रुपयांची बचत करणे रेल्वे विभागाला शक्य झाले आहे. यामुळे प्रवाशी सुविधांमध्ये वाढ करण्यास मदत झाल्याचे रेल्वे विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.
रेल्वेचे प्रशासकीय कार्यालय होणार एलईडीमय
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने सुरूवातीला एलईडी लाईटचा प्रयोग २६० रेल्वे स्थानकावर केला. त्याचे चांगले परिणाम दिसून आल्यानंतर आता तिन्ही मंडळातील सर्व प्रशासकीय भवन, कर्मचारी वसाहती व रेल्वेच्या लहान मोठ्या सर्वच कार्यालयात एलईडीे लाईट लावण्यात येणार आहे. त्याचे काम देखील काही ठिकाणी सुरू झाल्याची माहिती आहे.

Web Title: Railway station got LED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.