रेल्वे स्थानक परिसर झाला अतिक्रमणमुक्त

By admin | Published: March 7, 2017 12:54 AM2017-03-07T00:54:49+5:302017-03-07T00:54:49+5:30

रेल्वे सुरक्षा दलाच्या सहकार्याने गोंदिया रेल्वे स्थानकाच्या दक्षिण भागाकडील बुकींग कार्यालय परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले.

Railway station premises becomes encroachment free | रेल्वे स्थानक परिसर झाला अतिक्रमणमुक्त

रेल्वे स्थानक परिसर झाला अतिक्रमणमुक्त

Next

अनेक वर्षांचे बस्तान गुंडाळले : बांधकाम हटविण्यासाठी आरपीएफकडून कारवाई
गोंदिया : रेल्वे सुरक्षा दलाच्या सहकार्याने गोंदिया रेल्वे स्थानकाच्या दक्षिण भागाकडील बुकींग कार्यालय परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. अतिक्रमण हटविण्यात आल्यावर सदर परिसर पूर्ण खुला व विस्तृत दिसून येत आहे.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ मार्चच्या सायंकाळी एका दुकानदाराचे अतिक्रमण हटविण्यात आले व उर्वरित दुकानदारांनी आपले अतिक्रमण हटवावे, अशी सूचना देण्यात आली. परंतु ६ मार्च रोजी अतिक्रमण हटविण्यास अधिकारी गेल्यावर कोणीही आपले अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेतला नाही. शेवटी अधिकाऱ्यांनी रेल्वे सुरक्षा दलाचे सहकार्य घेवून अतिक्रमण हटविले.
या कार्यवाहीत रेल्वेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी तथा रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक बी.एन. सिंग व अनेक कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यवाही नंतर रेल्वेचा श्री टॉकिजच्या दिशेकडील प्रवेशद्वारे मोठा दिसून येत आहे. अशा प्रकारची कार्यवाही पूर्वीसुद्धा करण्यात आली होती. परंतु नंतर पुन्हा अतिक्रमण करण्यात आले होते.(प्रतिनिधी)

Web Title: Railway station premises becomes encroachment free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.