निवडणूक प्रचारात पावसाचा व्यत्यय

By admin | Published: June 20, 2015 01:34 AM2015-06-20T01:34:32+5:302015-06-20T01:34:32+5:30

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल झाल्यानंतर अनेकांनी जनसंपर्काला सुरुवात केली आहे.

Rain interruption in election campaign | निवडणूक प्रचारात पावसाचा व्यत्यय

निवडणूक प्रचारात पावसाचा व्यत्यय

Next

उमेदवारांची तारांबळ : शेतकरी कामात व्यस्त
गोंदिया : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल झाल्यानंतर अनेकांनी जनसंपर्काला सुरुवात केली आहे. परंतू गेल्या चार दिवसांपासून दररोज पाऊस हजेरी लावत असल्याने शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांना प्रचारात मोठी अडचण जात आहे.
संगणकाच्या युगात आज मोठ्या प्रमाणत सोशल मिडियाचा वापर होताना दिसत आहे. काळानुरुप प्रत्येकाला बदल स्विकारावा लागत आहे. येत्या ३० जून रोजी मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे पहिल्यांदाच उमेदवारांकडून जिल्हा परिषद विभाग आणि पंचायत समित्यांच्या निवडणुक गणासाठी निवडणूक आयोगाने आॅनलाईन अर्ज मागविले आहे. उमेदवारांनी देखील आॅनलाईन नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७७५ नामनिर्देशन पत्रे आॅनलाईन भरुन उमेदवारांनी सहकार्य केले.
जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी उमेदवारांनी ४५७ व पंचायत समिती निर्वाचक गणासाठी ६५३ असे एकूण १११० नामनिर्देशन पत्रे भरली. यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी ३३० व पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी ४४५ असे एकूण ७७५ नामनिर्देशन पत्रे उमेदवारांनी आॅनलाईन भरली. आॅफलाईन नामनिर्देशन पत्राची संख्या जि.प. निवडणूक विभागासाठी १२७ व पंचायत समिती निर्वाचक गणासाठी २०८ अशी एकूण ३३५ इतकी आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी आॅनलाईन नामनिर्देशन पत्रे सादर करुन संगणक युगात आपण सुद्धा असल्याची प्रचिती दिली आहे.
गोंदिया जिल्ह्याची ओळख जरी मागास, दुर्गम व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून असला तरी मिनी मंत्रालयात लोकप्रतिनिधी म्हणून प्रवेश करण्यास इच्छुक उमेदवारांनी आॅनलाईन नामनिर्देशन पत्रे सादर करण्याच्या पद्धतीचा स्विकार करीत आपण सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करीत असल्याचे सिद्ध केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Rain interruption in election campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.