वादळीवाºयासह पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:11 PM2017-10-15T22:11:34+5:302017-10-15T22:11:45+5:30
इटखेडा, इसापूर, कोरंभी, वडेगाव/स्टे., कन्हाळगाव, घाटी पळसगाव, खामखुर्रा, हेटी, येगाव, जाणवा, कोरंभीटोला, मांडोखाल, मांडोखालटोला, अरुणनगर, गौरनगर या गावात ....
लोकमत न्यूज नेटवर्क
इसापूर : इटखेडा, इसापूर, कोरंभी, वडेगाव/स्टे., कन्हाळगाव, घाटी पळसगाव, खामखुर्रा, हेटी, येगाव, जाणवा, कोरंभीटोला, मांडोखाल, मांडोखालटोला, अरुणनगर, गौरनगर या गावात १३ व १४ आॅक्टोबरला आलेल्या वादळीवारा व पावसाने शेतातील धानपिक पूर्णत: जमीनदोस्त झाले असून बळीराजाच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे आधीच मेटाकुटीस आलेला बळीराजा हवालदिल झाला आहे. मात्र अजूनपर्यंत कुणीही समाजसेवक, राजकारणी किंवा स्वत:ला शेतकºयांचे कैवारी समजणारे अजूनही झोपले आहेत काय? असा प्रश्न शेतकरी विचारु लागला आहे.
तालुक्यात कुणी हलके तर कुणी भारी धान पीक लावले आहे. धान पीक लावणीपासूनच विविध किडी व रोगांसाठी महागडे किटकनाशक फवारणी करुन धान वाचविण्याच्या प्रयत्न शेतकरी करीत आहे. बळीराजाने प्रति एकर २५ हजार रुपये खर्च केले आहेत. मात्र १३ व १४ आॅक्टोबर रोजी आलेल्या वादळी वाºयासह पावसाने शेतातील पीक पूर्णत: पडले असून धानाच्या रोपट्यांवरुन पाणी वाहत आहे. त्यात इटियाडोह धरणाच्या कालव्याचे पाणी सुरू असून कसलेही नियोजन नाही. एकीकडे पाणी वाचविण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे इटियाडोह धरणातून विनाकारण पाण्याचा अपव्यय होत आहे. परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीची धुमाळी सुरू असून शेतकरी मात्र भरडला जात आहे. तरी वरील गावांची पाहणी करुन झालेली नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.