जिल्ह्यात पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 09:11 PM2018-02-11T21:11:39+5:302018-02-11T21:12:13+5:30

वादळीवाऱ्यासह जिल्ह्यात रविवारी (दि.११) अचानकच पावसाने हजेरी लावून अवघ्या जिल्ह्याला ओलेचिंब करून टाकले. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत या पावसाने हजेरी लावली.

Rainfall in the district | जिल्ह्यात पावसाची हजेरी

जिल्ह्यात पावसाची हजेरी

Next
ठळक मुद्देवादळीवाऱ्यासह बरसला : रब्बी पिकांना काही प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वादळीवाऱ्यासह जिल्ह्यात रविवारी (दि.११) अचानकच पावसाने हजेरी लावून अवघ्या जिल्ह्याला ओलेचिंब करून टाकले. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे क्षुल्लक सोडून मोठ्या नुकसानाची माहिती नाही. तर काही प्रमाणात रब्बी पिकांचे नुकसान होणार असल्याचे कळते.
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणावरून पाऊस येणार अशी शक्यता दिसून येत होती. त्यात रविवारी (दि.११) दुपारपर्यंत खुल्या वातावरणात अचानकच ढग दाटून आले व दुपारी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत या पावसाने हजेरी लावली असल्याची माहिती आहे.
वादळीवाऱ्यासह अचानकच बरसलेल्या या पावसामुळे पावसाळाच सुरू झाल्यासारखे वाटू लागले. या पावसामुळे कोठेही मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही. मात्र चना, लाखोळी, तुर सारख्या रब्बी पिकांना काही प्रमाणात नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे.
करटी बु. येथे घराचे छत पडले
रविवारच्या वादळी पावसामुळे तिरोडा तालुक्यातील ग्राम करटी बु. येथील प्यारेलाल लहुजी कटरे यांच्या घराचे छत पडले. यात त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत अन्य काही हाणी झाली नाही.
गोंदियात होर्डींग्स पडले
वादळीवाऱ्यामुळे शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले होर्डींग्स पडल्याचे चित्र बघावयास मिळाले. कित्येक भागातील होर्डींग्स वादळीवाऱ्यामुळे फाडल्याचेही दिसले.
कार्यक्रमांचे मंडप उडाले
सध्या लग्नसराईचा हंगाम असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लग्न कार्य सुरू आहे. वादळीवाऱ्यामुळे अर्जुनी-मोरगाव येथे लग्नाचे मंडप उडाल्याचे व पडल्याचे प्रकार घडले. यामुळे कार्यक्रमात अव्यवस्था निर्माण झाली.
पावसामुळे थंडीचा जोर वाढला
मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाला होता व उन्हाचे चटके जाणवत होते. त्यामुळे दिवसा पंखा सुरू करण्याची पाळी आली होती. शिवाय गरम कापडांची गरज भासत नव्हती. मात्र रविवारी अचानकच बरसलेल्या अवकाळी पावसामुळे गेलेली थंडी परतून आली व थंडीचा जोर वाढला. पावसामुळे वाढलेल्या थंडीला बघता पुन्हा गरम कपडे काढण्याची पाळी आली. मात्र या बदलत्या वातावरणाचा आरोग्य परिणाम जाणवतो.

Web Title: Rainfall in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस