वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 09:59 PM2018-02-14T21:59:57+5:302018-02-14T22:00:21+5:30
मागील तीन दिवसांपाूसन ढगाळ वातावरण होते. त्यामुळे रब्बी पीक लावणारे शेतकरी चिंतेत होते. शेवटी पावसासोबत वादळी वारा व गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
ऑनलाईन लोकमत
सालेकसा : मागील तीन दिवसांपाूसन ढगाळ वातावरण होते. त्यामुळे रब्बी पीक लावणारे शेतकरी चिंतेत होते. शेवटी पावसासोबत वादळी वारा व गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर वातावरणात गारवा आल्याने पुन्हा थंडीचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे लोकांना गरम कपडे घालून बाहेर पडावे लागत आहे.
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे मोहर मोठ्या प्रमाणात झडून पडल्याने आंब्याच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे हरभरा, वटाणा, लाखोळी, उडीद, जवस इत्यादी रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला आहे. लाखोळीचे पीक धोक्यात आले आहे. हरभऱ्याच्या पिकाचे सुद्धा नुकसान झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात उन्हाची चाहूल लागत पावसाने आता पुन्हा हिवाळा परतल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे यंदा महाशिवरात्रीनंतर काही दिवस थंडीचा जोर राहिल. तर काही दिवस दिवसा उष्णता आणि रात्रीला थंडी वाटणारे वातावरण राहील. परंतु पाऊस जास्त प्रमाणात आला नाही. जमिनीचा ओलावा लवकर कमी होऊन थंडीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे.