सोसाट्याच्या वादळासह गारांचा पाऊस

By admin | Published: May 6, 2016 01:30 AM2016-05-06T01:30:13+5:302016-05-06T01:30:13+5:30

दिवसभर उन्ह तापल्यानंतर बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले. सहा वाजताच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वादळ सुटला

Rainfall with thunderstorms | सोसाट्याच्या वादळासह गारांचा पाऊस

सोसाट्याच्या वादळासह गारांचा पाऊस

Next

गारांसह पावसाने झोडपले : तुमसरात गारा, वरठीत पडझड, भंडारा, मोहाडी शहरात वीज पुरवठा खंडित
भंडारा : दिवसभर उन्ह तापल्यानंतर बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले. सहा वाजताच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वादळ सुटला त्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाच्या सरी कोसळल्यामुळे उकाडा वाढला आहे. वादळामुळे काही ठिकाणी विजेचे खांब वाकले. भंडारा वरठी, मोहाडी याठिकाणी रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. कापणीयोग्य धानाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

तुमसरात गारांचा पाऊस
तुमसर : बुधवारी सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह तुमसर शहर व परिसरात सुमारे दीड ते दोन तास पाऊस बरसला. उष्णतेपासून नागरिकांची काही अंशी सुटका झाली. बुधवारी सायंकाळी ५ वाजतापासून आकाशात ढगांनी गर्दी केली. दुपारी २ पासूनच ढगाळ वातावरण होते.
सायंकाळी ६ वाजता ढगांमुळे अंधार पसरला. पाहता पाहता मेघगर्जनेसह व सुसाट वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट सुरु होता. त्यामुळे रस्त्यावरील वाहने जागीच थांबली. तुमसर शहर व परिसरात लहानलहान गाराही पडल्यामुळे बच्चे कंपनी आनंद लुटत होते.
वरठी घरांची पडझड
वरठी : अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे वरठी येथील अनेक घरांचे पत्रे उडाले. नेहरू वॉर्डातील डॉ.बाबुराव कारेमोरे यांच्या घरांचे छतावरील सुरक्षा कठडे लगतच्या दुकानाच्या टिनाच्या शेडवर पडले. दरम्यान तिथे काम करणारे विजय अवजेकर यांच्या अंगावर ते पडल्यामुळे विजयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला भंडारा येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. हनुमान वॉर्डचे ग्रामपंचायत सदस्य थारणोद डाकरे यांच्या घरावरचे सिमेंट पत्रे उडाले.
मोहाडीत नुकसान
मोहाडी : सायंकाळच्या सुमारास बरसलेल्या धोधो पावसामुळे विजेचे खांब वाकले. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. चक्रीवादळामुळे अनेक घरांचे छत उडून अस्ताव्यस्त पसरले होते. रस्त्यावर तारा पडलेल्या होत्या. खंडीत वीज पुरवठ्यामुळे अंधार पसरलेला होता.
पवनीत वीज कोसळली
पवनी : पवनी शहरात सायंकाळी पवनी किल्ल्यावर वीज कोसळली. यात कित्येक वर्षापासून असलेला वृक्ष जळून खाक झाला. काही काळ शहरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. वीज कोसळली असली तरी कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. पालांदूर परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडीत झालेला होता.

Web Title: Rainfall with thunderstorms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.