पावसाने साखरीटोला परिसराला झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:48 AM2021-05-05T04:48:16+5:302021-05-05T04:48:16+5:30
साखरीटोला : सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने व गारपिटीने साखरीटोला व आजूबाजूच्या गावाला चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे रबी ...
साखरीटोला : सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने व गारपिटीने साखरीटोला व आजूबाजूच्या गावाला चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे रबी धानपीक शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.
ऐन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १ तारखेपासूनच ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे कडक उन्हापासून लोकांना दिलासा मिळाला होता. त्यातच ३ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. संपूर्ण परिसराला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळेसुद्धा रबी धानाचे नुकसान झाले. धान कापणीला आले आहे. अशा धानाला गारपीट आणि वादळी पावसाचा तडाखा बसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात हेटीटोला, सातगाव, कारुटोला, गांधीटोला, सलंगटोला, तसेच इतर गावांचा समावेश आहे. नुकसानग्रस्त गावांचा सर्व्हे करून शासनाने आर्थिक नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.