अवकाळी पावसाने लाखो क्विंटल धान भिजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 06:00 AM2019-12-27T06:00:00+5:302019-12-27T06:00:06+5:30

हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. गुरूवारी पहाटेच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सकाळी १० वाजेपर्यंत काही भागात रिमझिम पाऊस सुरूच होता. आमगाव, सडक अर्जुनी, तिरोडा, गोंदिया,अर्जुनी मोरगाव,सालेकसा तालुक्यात पाऊस झाल्याने याचा धानाची मळणी करीत असलेल्या शेतकऱ्यांना फटका बसला.

The rains soaked up millions of quintals of paddy | अवकाळी पावसाने लाखो क्विंटल धान भिजले

अवकाळी पावसाने लाखो क्विंटल धान भिजले

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटका : शासकीय धान खरेदी, पाखड धानाची समस्या वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात गुरूवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या लाखो क्विंटल धान भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे धान पाखड होण्याची शक्यता असून शेतकºयांना धानाची विक्री करण्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांवर असमानी संकट कोसळले आहे. जिल्ह्यात गुरूवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ७२ मि.मि.पावसाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. गुरूवारी पहाटेच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सकाळी १० वाजेपर्यंत काही भागात रिमझिम पाऊस सुरूच होता. आमगाव, सडक अर्जुनी, तिरोडा, गोंदिया,अर्जुनी मोरगाव,सालेकसा तालुक्यात पाऊस झाल्याने याचा धानाची मळणी करीत असलेल्या शेतकऱ्यांना फटका बसला. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे धान खरेदी केंद्र आहेत. या केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा धान विक्रीसाठी पडून आहे. आदिवासी विकास महामंडळाचा खरेदी केलेला संपूर्ण ४ लाख क्विंटल धान उघड्यावर असून याला अवकाळी पावसाचा फटका बसला. पावसामुळे धान भिजल्याने ते पाखड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत ८ लाख क्विंटल धान खरेदी केला असून यापैकी काही धान गोदामात तर काही धान ताडपत्र्या झाकून केंद्रावर पडला आहे. चार दिवसांपूर्वी सरकारने धानाच्या हमीभावात दोनशे रुपये प्रती क्विटंल दर वाढविल्याने शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर गर्दी केली होती. शेकडो शेतकऱ्यांच्या धानाचा काटा न झाल्याने ते खरेदी केंद्राच्या आवारात तसेच पडून आहे.
दरम्यान गुरूवारी सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राकडे धान घेत ताडपत्र्या झाकून धानाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. मात्र केंद्रावर शेतकरी पोहचेपर्यंत धानाचे पोते ओले झाल्याने शेतकºयांना नुकसान सहन करावे लागले. आमगाव तालुक्यातील कट्टीपार, कालीमाटी, सुपलीपार, गोरठा आणि तिगाव या धान खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात धान ओले झाले. त्यामुळे हे वाळविल्याशिवाय विकता येणार नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

रब्बी पिकांना फटका
जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात काही प्रमाणात भाजीपाला पिकांचा देखील समावेश आहे.अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांवरील संकट कायम आहे.

केंद्र संचालकांचे जीआरवर बोट
शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी नेणाऱ्या शेतकऱ्यांचा धानाचा काटा न झाल्यास ते धान केंद्रावर उघड्यावर पडून असल्यासमुळे भिजल्यास अथवा चोरीला गेल्यास यासाठी खरेदी केंद्र व शासन जबाबदार राहणार नाही, असे शासनाच्या जीआरमध्ये नमूद आहे.सध्या सर्वच केंद्रावर शेतकऱ्यांच्या लाखो क्विंटल धानाचा काटा व्हायचा आहे. पावसामुळे हे धान भिजून नुकसान झाले असून याची कुठलीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे.
खरेदी केंद्रावर ताडपत्र्यांचा तुटवडा
शासकीय धान खरेदी व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धानाची विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा नियम आहे. तर पावसापासून धानाचे संरक्षण करण्यासाठी ताडपत्र्यांची व्यवस्था असणे आवश्यक आहे. पण अनेक धान खरेदी केंद्रावर ताडपत्र्यांचा तुटवडा होता. तर काही केंद्रावर फाटलेल्या ताडपत्र्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ
गुरूवारी जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसामुळे खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांचे धान भिजल्याने ते पाखड झाले. पाखड झालेले धान खरेदी केले जात नसल्याने हे धान मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची कोंडी
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा धानाचा काटा आठ आठ दिवस होत नसल्याने शेतकऱ्यांना धानाची राखन करीत केंद्रावर राहावे लागत आहे. त्यातच गुरूवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान सहन करावे लागले. याची नुकसान भरपाई सुध्दा शासनाकडून मिळणार नसल्याने खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी केली जात आहे.

Web Title: The rains soaked up millions of quintals of paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.