तालुक्यात पावसाने घातले थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:33 AM2021-09-12T04:33:14+5:302021-09-12T04:33:14+5:30
सालेकसा : संपूर्ण जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळ पडतो की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसह नागरिकांना पडला होता. मात्र, २ दिवसांपासून सतत ...
सालेकसा : संपूर्ण जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळ पडतो की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसह नागरिकांना पडला होता. मात्र, २ दिवसांपासून सतत बरसलेल्या पावसामुळे पुजारीटोला धरणासह शिरपूरबांध व कालिसराड धरण भरलेले आहे. यात पुजारीटोला धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले व त्यामुळे नदीकाठावरील परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागील २ दिवसांपासून बरसलेल्या दमदार पावसामुळे पुजारीटोला धरणात ९५ टक्के जलसाठा झाला होता. शिरपूरबांध धरणात ३४ टक्के तर कालीसराड धरणात ८० टक्के पाणीसाठा झाला होता. या धरणांच्या पाण्याच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाल्याने पुजारीटोला धरणाचे ६ दरवाजे १-१ फुटाणे शुक्रवारी (दि.१०) उघडण्यात आले होते, तसेच पावसाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, धरणातील जलसाठ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने, नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.