पावसाने दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:07 AM2017-10-22T00:07:14+5:302017-10-22T00:07:27+5:30

शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरात तसेच जवळपासच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले.

Rainy Harassment | पावसाने दाणादाण

पावसाने दाणादाण

Next
ठळक मुद्देग्राहकांची फजिती : शनिवारी दुपारी मुसळधार पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरात तसेच जवळपासच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले.
शनिवारी सकाळपासून ऊन निघाली होती. त्यामुळे पाऊस येणार नाही, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र दुपारी २ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. जवळपास एक तास पाऊस पडला. दिवाळीनिमित्त शहरातील दुकानांमध्ये गर्दी असल्याने काही सामान दुकानदारांनी बाहेर ठेवला होता. अचानक आलेल्या पावसामुळे दुकानदारांची चांगलीच धांदल उडाली. जवळपास १ तास पावसाने झोडपले. नाल्या ओव्हरफ्लो होऊन पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना पावसाच्या पाण्यातूनच वाट काढावी लागत होती.
भाऊबिजेचा सण असल्याने अनेक महिला भावाच्या घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. गडचिरोली शहरातील बसस्थानकासह बसथांब्यावर महिला प्रवाशांची मोठी गर्दी दिसत होती. दुपारपर्यंत ऊन असल्याने पावसापासून सुरक्षितता मिळविण्यासाठी कोणतेही साहित्य सोबत घेतले नव्हते. अचानक झालेल्या पावसामुळे महिला प्रवाशांचीही चांगलीच फजिती झाली. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या इतर भागातही दमदार पाऊस झाला. भामरागड तालुक्यातही जोरदार पाऊस पडला.
जड धान निसवत आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतातील धानाला पाण्याची गरज होती. शनिवारच्या पावसाने ही गरज पूर्ण झाली. मात्र हलक्या धानाची कापणी सुरू असून परतीच्या पावसाचा मोठा फटका हलक्या धानाला बसला आहे.

हलक्या धानासह मध्यम कालावधीच्या धानालाही फटका
आठ दिवस उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. मध्यंतरीच्या कालावधीत हलक्या धानाची कापणी करण्यात आली. आता मध्यम कालावधीच्या धानाची कापणी सुरू आहे. अशातच पावसाने आणखी जोर धरला आहे. कापलेल्या धानाच्या कळपांमध्ये पाणी शिरले असल्याने शेतकºयांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे जड धानावर मावा, तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. जड धान निसवत असतानाच मावा, तुडतुडा लागल्याने धानाच्या उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हजारो रूपयांची कीटकनाशके फवारूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

Web Title: Rainy Harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.