राजाभोज यांचे विचार आत्मसात करावे!

By admin | Published: February 7, 2017 01:00 AM2017-02-07T01:00:47+5:302017-02-07T01:00:47+5:30

समाजाच्या लोकांना आपल्या समाजाचा इतिहासच माहित नसल्याने समाज भटकत राहिला. शेतीवर उदरनिर्वाह करुन कुटूंब चालवणे एवढेच काम समाजवासी करीत होते.

Rajbhoj should understand the thoughts! | राजाभोज यांचे विचार आत्मसात करावे!

राजाभोज यांचे विचार आत्मसात करावे!

Next

योगेंद्र भगत : परसवाड्यात राजाभोज जयंती कार्यक्रम उत्साहात
परसवाडा : समाजाच्या लोकांना आपल्या समाजाचा इतिहासच माहित नसल्याने समाज भटकत राहिला. शेतीवर उदरनिर्वाह करुन कुटूंब चालवणे एवढेच काम समाजवासी करीत होते. मात्र आज समाज एकत्रीत होणे काळाची गरज असून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात समाजाचे कार्य करुन चक्रवती राजाभोज यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे असे मत डॉ. योगेंद्र भगत यांनी व्यक्त केले.
येथील पोवार समाज नवयुवक संघटनेंंतर्गत क्षत्रीय राजाभोज चक्रवती जयंती कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. वसंत भगत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जगदीश भगत, चर्तूभूज बिसेन, उद्योगपती मोतीलाल चौधरी, राधेलाल पटले, मुकेश भगत, तिलक भगत, खेमलाल भगत, संतोष बोपचे, अजा चौधरी, भैय्यालाल भगत उपस्थित होते. सर्वप्रथम राजाभोज चक्रवती यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन गावात रॅली काढण्यात आली.
या रॅलीला उपाध्यक्ष राधेलाल पटले यांच्या हस्ते झेंडी दाखविण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक जगदीश भगत, टोलीराम अंबुले, गुणवंता बोपचे, पुष्पा बोपचे, उषा ठाकरे, खेमणबाई अंबुले उपस्थित होते. सर्व पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त करुन समाजाला मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जगदीश भगत यांनी मांडले. संचालन लोकेश कटरे यांनी केले. आभार अनिल बोपचे यांनी मानले. कार्यक्रमासाठी संदीप भगत, झनक भगत, शिवलाल बोपचे, मानिक ठाकरे, योगेश अंबुले, सिताराम अंबुले, फेकन अंबुले व समाजातील नागरिकांनी सहकार्य केले.(वार्ताहर)

Web Title: Rajbhoj should understand the thoughts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.