राजीव गांधी यांचे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:31 AM2021-08-22T04:31:41+5:302021-08-22T04:31:41+5:30

गोंदिया : राजीव गांधी हे भारतात सगणक व दूरसंचार क्रांतीचे जनक होते. आज जे डिजीटल इंडिया अस्तित्वात येत आहे ...

Rajiv Gandhi's significant contribution in the field of science and technology () | राजीव गांधी यांचे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान ()

राजीव गांधी यांचे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान ()

googlenewsNext

गोंदिया : राजीव गांधी हे भारतात सगणक व दूरसंचार क्रांतीचे जनक होते. आज जे डिजीटल इंडिया अस्तित्वात येत आहे हे त्यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले आहे. लॅंडलाईन टेलीफोन ते मोबाईल फोन पर्यंतची क्रांती भारतात त्यांनी घडवून आणली. संगणकांमुळे आज जे जीवन सुसह्य झालेले आहे व एकाच ठिकाणी बसून संपूर्ण जगाशी संपर्क, व्यवहार व पैशांची देवाण-घेवाण इंटरनेटच्या माध्यमातून करता येते. ही त्यावेळी त्यांनी दाखविलेल्या दुर्दम्य साहसामुळेच शक्य झाले आहे. यामुळे राजीव गांधी यांचे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन कॉँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान यांनी केले.

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहीद भोला भवन येथे शुक्रवारी (दि.२०) आयोजित भारताच्या ९ व्या पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विशेष म्हणजे, यानिमित्त एनएसयुआयच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अध्यक्ष हरिष तुळसकर, युवक काँग्रेस अध्यक्ष अलोक मोहंती, बाबा बागडे, रुकनेस शेख, शैलेश बिसेन, वारिश भगत, मंथन नंदेस्वर, अमन तिगाला, कृष्णा विवार, मनिष चव्हाण, दलेश नागदवने यासह १८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. संचालन तालुकाध्यक्ष सुर्यप्रकाश भगत यांनी केले. आभार आनंद लांजेवार यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष अनिल गौतम, शहर अध्यक्ष जहीर अहमद, जिल्हा सचिव निकेश मिश्रा, ओबीसी विभाग अध्यक्ष जितोंद्र कटरे, बलजीत सिंह, बग्गा, राजू काळे, वंदना काळे, वनिता चिचाम, शैलेश जायस्वाल, अरुण गजभिये, नफिस सिध्दीकी, शिवनाथ वलथरे, काजल बरोने यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Rajiv Gandhi's significant contribution in the field of science and technology ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.