काँग्रेसचा तहसील कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:00 AM2018-02-24T01:00:09+5:302018-02-24T01:00:09+5:30
तालुका काँग्रेस पक्षातर्फे शासनाकडून जनसामान्य नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात शुक्रवारी (दि.२३) येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार साहेबराव राठोड यांना देण्यात आले.
ऑनलाईन लोकमत
आमगाव : तालुका काँग्रेस पक्षातर्फे शासनाकडून जनसामान्य नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात शुक्रवारी (दि.२३) येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार साहेबराव राठोड यांना देण्यात आले.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव सहेषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात येथील आंबेडकर चौकातून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या वेळी शिष्टमंडळातर्फे विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे तहसीलदार राठोड यांना देण्यात आले.
निवेदनातून तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार पिडित शेतकरी, शेतमजूर व सर्व सामान्य जनतेसाठी केंद्र व राज्य शासनाने कुठल्याही नवीन योजना काढल्या नाही. तर पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी.
तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, पीक विमाधारक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यात यावी. कृषी पंपधारक शेतकºयांचे विद्युत बिल माफ करावे, आमगाव तालुक्यातील गावांमध्ये रोजगार हमीची कामे सुरु करुन मजुरांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, खनन उत्खनन बाबतचे परिपत्रक रद्द करावे, दुष्काळ कर आकारणी बंद करणे, बेरोजगारांना शासकीय सेवेत समाविष्ठ करावे, तालुक्यात उद्योग धंदे उभारण्यात यावे, १५ लाख रुपये जनधन खात्यात जमा करावे आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, राजकुमार फुंडे, इशुलाल भालेकर, राधाकिसन चुटे, संजय डोये, दिगंबर कोरे, हुकुमचंद बहेकार, यादनलाल बनोठे, डॉ. राजकुमार चुटे, अजय खेतान, सरपंच उषा भांडारकर, संजय बहेकार, बळीराम कोटवार, दिलीप बैस, रवि अग्रवाल, महेश उके, लोकेश अग्रवाल, राजा मिश्रा, दिपक शर्मा, गणेश हुकरे, आनंद शेंडे, बंशीधर अग्रवाल, खेमचंद खोब्रागडे, प्रभादेवी उपराडे, नरेश बोपचे, आशिष टेंभुर्णे, रितेश रामटेके यांचा समावेश होता.