रमाई जयंती, महिला मेळावा उत्साहात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:31 AM2021-02-11T04:31:18+5:302021-02-11T04:31:18+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विमल कटरे होत्या. उद्घाटन छाया पटले यांच्या हस्ते तर छाया ब्रम्हवंशी, रिता दोनोडे, प्रा. इंद्रकला बोपचे, संगीता ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विमल कटरे होत्या. उद्घाटन छाया पटले यांच्या हस्ते तर छाया ब्रम्हवंशी, रिता दोनोडे, प्रा. इंद्रकला बोपचे, संगीता चवरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात त्यागमूर्ती रमाई आणि सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला मार्ल्यापण करुन करण्यात आली.
क्रांतिबंड संघटनेच्या विदर्भ प्रांत संघटक किरण मोरे चव्हाण यांनी यावेळी विधवा महिलांना वाण, तिळगूळ देत सन्मान केला. या कार्यक्रमासाठी लोकमत सखी मंचच्या सदस्यांचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संगीता चवरे यांनी रमाई आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. प्रा. इंद्रकला बोपचे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. छाया पटले आणि छाया ब्रम्हवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विमल कटरे यांनी माहिलांविषयी असणाऱ्या जुन्या चालीरीती, रूढी परंपरा आता बंद झाल्या पाहिजे. त्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले. रमाई, सावित्रीबाई फुले यांच्यावर कवयित्रींनी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कांचन गोलीवर, ज्योती बागडे, संध्या कटरे, ललिता मानकर, नीता कांबळे, शोभा राऊत, प्रीती मडावी, दीपाली बारसे, ममता चुटे, बबिता कापसे, वच्छला कापसे, विद्या बोहरे, कीर्ती कवरे, सीमा हरिणखेडे, ममता पटले, हेमलता मोटघरे, दीप्ती ब्राम्हणकर, सपना सहारे, सरिता शहारे, शर्मिला तुरकर, सोनिया कटरे, कीर्ती कवरे यांनी सहकार्य केले.
......
विधवा शब्द हटवून श्रीमती शब्दाला मान द्या
किरण मोरे यांच्यासह सर्व महिलांनी विधवा शब्द हटवून श्रीमती या शब्दाचा वापर करावा जसे अपंग हा शब्द बाद करून दिव्यांग या शब्दाला मान्यता मिळाली त्याचप्रमाणे श्रीमती या शब्दालासुद्धा शासनाने मान्यता द्यावी अशी मागणी केलेली आहे.