रमाईंना जंयती दिनी अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 09:43 PM2018-02-11T21:43:34+5:302018-02-11T21:44:05+5:30
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशामध्ये सावली सारखी उभी राहून दीनदलितांची माता ठरलेली मातोश्री रमाई आंबेडकर.....
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशामध्ये सावली सारखी उभी राहून दीनदलितांची माता ठरलेली मातोश्री रमाई आंबेडकर यांची जयंती बौद्ध समाजाच्यावतीने मातोश्री रमाई चौकात साजरी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी भाग्यवान फुल्लुके होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाऊदास वालदे, पृथ्वीराज मेश्राम, सखाराम रामटेके, नंदलाल बोरकर, कांता रामटेके, अशोक रामटेके, संतोष टेंभुर्णे, नितीन रामटेके, अजय वालदे, शांतीप्रकाश भैसारे, संगीता नंदेश्वर, देवा झोळे, आरोग्य सेवक साखरे, बंडू झोळे उपस्थित होते.
सर्वप्रथम रमाईंच्या पुतळ्यासमोर दीप प्रज्वलन व माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. धम्म उपासक एकनाथ बोधी यांनी रमाईच्या त्यागाची महती विशद केली.
याप्रसंगी उपस्थित महिलांनी रमाईचे गुणगौरव गीतांमधून सादर केले.